Save Mhadei Save Tiger Dainik Gomantak
गोवा

Save Mhadei Save Tiger: सरकार गोव्याचे की कर्नाटकचे? 'म्हादई बचाव'चा उद्विग्न सवाल

राजन घाटे : व्याघ्र प्रकल्प राबवता येत नसेल तर राजीनामा द्या!

गोमन्तक डिजिटल टीम

Save Mhadei Save Tiger व्याघ्र प्रकल्प हा म्हादई बचावाचा चांगला मार्ग आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आणि जनतेने पाठिंबा देऊनही सावंत सरकार कर्नाटकचे हित सांभाळत असेल तर हे सरकार गोव्याचे की कर्नाटकचे, असा प्रश्न उपस्थित होतो.

हा व्याघ्र प्रकल्प राबवता येत नसेल तर सरकारने तातडीने राजीनामा द्यावा आणि कर्नाटकात जावे, असा सज्जड दम आरटीआय कार्यकर्ते आणि म्हादई बचाव आंदोलनाचे नेते राजन घाटे यांनी सरकारला दिला आहे.

पत्रकार परिषदेत घाटे बोलत होते. यावेळी प्रतिमा कुतिन्हो, मारियानो फेर्रांव, अनिल लाड, फेलिजिया रापोझ, पेर्पेट फेर्रांव उपस्थित होते.

घाटे म्हणाले की, आपले राज्य किनारपट्टीवर आहे. हवामान बदल तज्ज्ञांच्या मते समुद्र पातळी वाढीमुळे गंभीर पर्यावरणीय धोके निर्माण होऊ शकतात. किनारी भागात खारफुटीची जंगले आणि हिरव्यागार पश्चिम घाटाच्या काही भागांत उरलेले सदाहरित जंगल चक्रीवादळ, भूकंप, पूर आणि इतर आपत्तींपासून नैसर्गिक संरक्षण देईल.

प्रस्तावित व्याघ्र प्रकल्पाखालील वनक्षेत्र गोव्याला वाचवण्यास मदत करेल. सध्या हिमालयीन प्रदेशातील आपत्ती आणि निसर्गाचा प्रकोप आपण पाहात आहोत. राज्यात वाघ होते आणि आहेत. २०१३ मध्ये, कॅमेरा ट्रॅप तंत्राद्वारे घेतलेल्या पहिल्या छायाचित्रानंतर आता नव्याने घेतलेल्या ट्रॅपमध्येही वाघ दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT