Crime Case Dainik Gomantak
गोवा

नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षांच्या तरुणीने जीवन संपवलं, सत्तरीत शोककळा

ऋतुजाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

Ganeshprasad Gogate

Goa's Nursing student committed Suicide in Karnataka

सध्या किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक ताणतणावामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले असून सत्तरी येथून अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘कर्नाटक येथील आरोग्य धाम’ आवारातील नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंग डिप्लोमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेली सत्तरी गोवा येथील ऋतुजा रमेश पाडलोस्कर (वय 21 वर्षे) हिने नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या केल्याचे वृत्त हाती आले आहे.

याविषयी मिळालेल्या माहिती नुसार ऋतुजा हिने 30 ऑक्टोबरला अंतिम वर्षाची प्रात्यक्षिक परीक्षा दिली होती. त्यानंतर सायंकाळी तिने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली. तिला जखमी अवस्थेत के.एच.आय. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटप्रभाचे पोलीस निरीक्षक बसवराज कामानबैलू या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ऋतुजाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे सत्तरी परिसरात शोककळा पसरली आहे

दरम्यान दोन दिवसांपूर्वी गोव्यात कामानिमित्त दाखल झालेल्या ओडिसा येथील नवदाम्पत्यापैकी पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. गोव्यात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून पोलीस यंत्रणा गुन्हेगारी थोपवण्याचा प्रयत्न करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

SCROLL FOR NEXT