Divya Rane
Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: डबल इंजिन सरकारमुळेच सत्तरीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Electricity Issue: लवकरच सत्तरीतील वीज समस्या सुटणार असल्याची माहिती डॉ. दिव्या राणे यांनी दिली. नगरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या नगरगाव फिडरच्या 11 के.व्ही. नवीन भूमीगत वीज वाहिनी घालण्याच्या कामाच्या पायाभरणी कार्यक्रमात राणे बोलत होत्या.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, सरपंच संध्या खाडीलकर, खोतोडाचे सरपंच रोहीदास गावकर आदींची उपस्थिती होती.

डॉ. दिव्या राणे पुढे म्हणाल्या की, येथील बहुतेक वीज वाहिन्या या 40 वर्षांपूर्वी घालण्यात आल्या होत्या. या वाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटणे, कार्बन होणे आदी प्रकार सातत्याने होत असत. तसेच पावसाळ्यात झाडे पडणे आदी कारणानेही वीज पुरवठ्यात व्यत्यय येत असे.

त्यामुळे भूमीगत वीज वाहिन्या घालण्यास प्राधान्य दिले आहे. नगरगाव 11 केव्ही फिडर भूमीगत वीज वाहिनीने जोडण्याचे कामाचा आज शुभारंभ झाला आहे.

याचा फायदा नगरगाव पंचायतीबरोबर सावर्डे, खोतोडा पंचायतींनाही होणार आहे. या कामासाठी एकूण 24 कोटी रुपये खर्च येणार आहे.

दोन टप्प्यात हे काम केले जाईल. या कामासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे त्या म्हणाल्या.

राणे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून तसेच नामफलकाचे अनावरण करून भूमीगत वीज वाहिनीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

डबल इंजिनमुळे सत्तरीचा विकास:-

राणे पुढे म्हणाल्या, भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे आज सत्तरीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आपण सत्तरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. आपण सर्वांना एकत्र राहून सत्तरीला पुढे घेउन जाऊया असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

SCROLL FOR NEXT