Vishwajit Rane |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane Statement: 'सत्तरीच्या विकासासाठी कटिबद्ध' - विश्‍वजित राणे

Vishwajit Rane: सावर्डे-कुडणेतील सभेत विकासावर चर्चा

दैनिक गोमन्तक

Vishwajit Rane: सावर्डे ही सत्तरी तालुक्यातील आपली हक्काची पंचायत असून येथील 80 टक्के लोकांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास निश्‍चित येणाऱ्या काळात होणार असून सत्तरीच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सावर्डे पंचायत क्षेत्रातील कुडणे-सत्तरी येथील देवस्थानच्या सभागृहात ग्रामस्थांतर्फे आयोजित जाहीर सभेत केले.

सावर्डे पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांतर्फे आरोग्यमंत्री विश्वजित राणे व विनोद शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर समाज सेवक विनोद शिंदे, सावर्डे सरपंच उज्वला गावकर, पंच बाळू राणे, पंच सदस्य शिवा कुडशेकर, शिवाजी देसाई, बुधाजी म्हाळशेकर, अक्षदा गावकर, यशोदा गावडे, नारायण गावकर आदींची उपस्थिती होती.

मंत्री राणे म्हणाले, सत्तरीतील युवक व महिलांच्या कल्याणासाठी भाजप सरकार सतत कार्यरत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या सहकार्याने आणि पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी दिलेल्या जबाबदारीमुळे सत्तरी तालुक्यातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी मी निर्माण करत आहे. मला मिळालेल्या वेगवेगळ्या खात्यांचा योग्य उपयोग हा गोव्यातील आणि विशेषतः सत्तरीतील जनतेसाठी करणार आहे.

जनतेचे भक्कम समर्थन

सत्तरी तालुक्याचा विकास हा सत्तरी तालुक्यातील माणूस व सत्तरीचाच नेता करू शकतो, त्यामुळे जे बाहेरून सत्तरीत येतात ते सत्तरीचा विकास करू शकणार नाहीत. ते युवकांची आणि सत्तरीतील जनतेची फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर सत्तरीची जनता विश्वास ठेवणार नाही, सत्तरीतील जनतेचे मला भक्कम समर्थन आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

जनतेने मतभेद विसरावेत

मी विकासाबाबत आजपर्यंत कधी भेदभाव केलेला नाही. तालुक्याचा सर्वार्थाने विकास करण्याचे काम सुरूच राहणार आहे. सावर्डे परिसराचा विचार केला तर या ठिकाणी आम्ही पूल बांधले, रस्ता, पाणीपुरवठा तसेच आरोग्य सेवा या भागात कार्यरत होणार आहेत. तसेच उर्वरित विकास कामे टप्याटप्याने पूर्ण करण्यात येईल, असे राणे म्हणाले.

प्रत्येक पंचायत क्षेत्रात क्रीडांगण

आपण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करतो. या सत्तरी तालुक्यातील गरिबी काय आहे, याची मला जाण आहे. सत्तरीत प्रत्येक पंचायत क्षेत्रात एक अद्ययावत क्रीडांगण उभारणीसाठी आपला प्रयत्न आहे. जागा उपलब्ध झाली तर सावर्डे पंचायतीत अशा प्रकारचा प्रकल्प आपण उभारणार आहे. यासाठी स्वखर्चाने जमीन घेण्यासही आपण तयार आहे, असे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

SCROLL FOR NEXT