Mopa Airport: PM मोदींच्या गोवा दौऱ्यावर शिक्कामोर्तब

Pramod Sawant Statement: 11 डिसेंबरला मोपा विमानतळाचे लोकार्पण
Pramod Sawant- Narendra Modi| Goa News
Pramod Sawant- Narendra Modi| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport: अनेक दिवसांपासून तारीख ठरत नसलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अखेर निश्चित झाला असून 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान गोवा दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी जागतिक आयुर्वेद काँग्रेसचा समारोप ते करतील.

याबरोबरच धारगळ येथे उभारलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचे उद्‍घाटनही त्यांच्या हस्ते होईल. याशिवाय मोपा विमानतळ आणि झुआरी पुलाचे उद्‍घाटनही त्यांच्या हस्ते त्याच दिवशी होईल. मात्र, याबाबतची घोषणा स्वतंत्रपणे होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

मुख्यमंत्री म्हणाले,  केंद्र सरकारचे आयुष मंत्रालयाच्यावतीने पणजीत 9 ते 11 डिसेंबर दरम्यान जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक परिषदेमध्ये 40 देशांतील साडेचार ते पाच हजार प्रतिनिधी सहभागी होतील.

काय आहे आयुर्वेद काँग्रेस?

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने दर दोन वर्षांनी जागतिक आयुर्वेद काँग्रेस आयोजित केली जाते. या परिषदेसाठी जगभरातून प्रतिनिधी उपस्थित राहतात. प्रामुख्याने आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आणि संशोधन, नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व्हावी यासाठी ही काँग्रेस आयोजित केली जाते. पहिल्यांदाच ही काँग्रेस राज्यात होत आहे.

Pramod Sawant- Narendra Modi| Goa News
Anupam Kher on Nadav Lapid: इफ्फीमध्ये 'The Kashmir Files' ला प्रोपगेंडा म्हणणाऱ्याला खेर यांनी फटकारले

आयुर्वेद संस्थेचे 11 रोजी लोकार्पण

जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषदेचा समारोप 11 डिसेंबर रोजी होणार असून त्या समारंभाला दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. तत्पूर्वी दुपारी 2 वाजता ते धारगळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेचे लोकार्पण करतील. यावेळी त्यांच्यासह आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com