Sawvan Friends Circle Association Awarded Central's 'Neharu Yuva Award' by CM Dr. Pramod Sawant. at Panajim (Goa)  Tukaram Sawant / Dainik Gomantak
गोवा

Goa: सर्वण फ्रेंड्स सर्कल असोसिएशनला नेहरू युवा केंद्राचा 'राज्य पुरस्कार'

क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाला (Goa)

Siddhesh Shirsat

डिचोली: डिचोलीतील सर्वण फ्रेंड्स सर्कल आणि कल्चरल असोसिएशनला यंदाचा नेहरू युवा केंद्राचा (Central's Neharu Yuva Award) उत्कृष्ट युवा क्लब म्हणून "राज्य पुरस्कार" (State Award) प्राप्त झाला आहे. भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात (Menezez Braganza hall) आयोजित समारंभात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ, पुरस्कारप्राप्त संस्थेचे अध्यक्ष रुपेश सावंत, दत्ताराम सावंत, हरिप्रसाद सावंत, विद्याधर सावंत, विनोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे (Award money Rs. One Lac). क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल क्लबला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वण फ्रेंड्स सर्कल आणि कल्चरल असोसिएशनचे गावात अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT