Mormugao Port Authority Dainik Gomantak
गोवा

MPT Goa: पगार 2 लाख रुपये महिना, गोव्यात सरकारी नोकरीची संधी; चाळीशीतील उमेदवारही करु शकतात अर्ज

Pramod Yadav

वास्को: बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मुरगाव बंदर प्राधिकरण गोवाच्या वतीने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बंदराच्या mptgoa.gov.in या संकेतस्थळावर यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या वतीने विविध पदाच्या 13 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात बहुतांश पदे अभियंता, सागरी आणि वित्त क्षेत्रातील लोकांसाठी आहेत. विविध पदांवरील पात्र उमेदवारांना 40 हजार ते 2 लाख रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

पद, जागा आणि पगार?

1) DY. SECRETARY (उपसचिव)

01 जागा, जीएडी विभाग (अनारक्षित)

वयोमर्यादा - 40

पगार - 60000 ते 1,80,000

2) ACCOUNTS OFFICER GR. I (लेखाधिकारी GR.I)

02 जागा (अनारक्षित)

वयोमर्यादा -30

पगार - 60000 ते 1,80,000


3) ASST. EXECUTIVE ENGINEER (ELECT) (सहाय्यक कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल)

01 पद (SC/ अनुसुचित जातीसाठी आरक्षित)

शिक्षण - यांत्रिक अभियांत्रिकी

वयोमर्यादा -30 (SC साठी पाच वर्षे शिथील)

पगार - 50,000-1,60,000


4) ASST. MATERIALS MANAGER GR. I (सहाय्यक साहित्य व्यवस्थापक Gr.I)

01 पद, (अनारक्षित) यांत्रिक अभियांत्रिकी

वयोमर्यादा - तीस वर्षे

पगार - 50000-160000

5) TRAINEE PILOT (ट्रेनी पायलट)

05 पदे, मरीन (1- ST, 3- OBC & 1-UR)

वयोमर्यादा - 40 (एसटीसाठी पाच तर ओबीसीसाठी तीन वर्ष शिथिलता)

पगार - 70,000-2,00,000

6) LAW OFFICER GR. II (कायदा अधिकारी Gr.II)

01 पद (एससी/ अनुसूचित जातीसाठी राखीव)

वयोमर्यादा - 40

पगार - 40,000-1,40,000

7) ASST. COST ACCOUNTS OFFICER (असिस्टंट कॉस्ट अकाउंट ऑफिसर)

01 पद, वित्त

वयोमर्यादा - 30

पगार - 40,000-1,40,000

8) ASST. ENGINEER (ELECT) (सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल)

01 पद, यांत्रिक अभियांत्रिकी

वयोमर्यादा - 40

पगार - 40,000-1,40,000

पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे सीए/मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/कायदा इत्यादी विषयातील आवश्यक प्रमाणपत्र /पदवी असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित इतर तपशील जॉब नोटिफिकेशन 2024 मध्ये तपासता येतील.

गोवा सरकारी नोकरी भरती अधिसूचना 2024 मध्ये, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वपूर्ण निकषांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.

या नोकर भरतीसाठी, उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने फॉर्म सबमिट करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, त्यात सर्व तपशील भरून, तो [ TO THE SECRETARY, MORMUGAO PORT AUTHORITY, HEADLAND, SADA, GOA -403804 ] या पत्यावर 22 ऑगस्टपूर्वी पाठवावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT