Goa CM Dr Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत रविवारी 'सरकार तुमच्या दारी'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत साधणार जनतेशी संवाद

Dainik Gomantak

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr Pramod Sawant) यांनी हाती घेतलेला 'सरकार तुमच्या दारी' (Sarkar Tumchya Dari) हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता.26) डिचोलीत होणार आहे. येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात (At Shantadurga High School, Bicholim) सकाळी 9 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे या कार्यक्रमांतर्गत जनतेशी संवाद साधणार आहेत. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (Mayem MLA Pravin Zantye) यांच्या उपस्थितीत डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर यांनी डिचोलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेवेळी भाजप महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक, मंडळ सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, सचिव तुळशीदास परब आणि डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित होते.

लसीकरण व्यवस्था

'सरकार तुमच्या दारी' उपक्रमांतर्गत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी डिचोलीत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून जनतेला सरकारी योजनांची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय अडीअडचणीही अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त आरोग्य विषयक तपासणीही करण्यात येणार आहे. लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचीही व्यवस्था असेल. अशी माहिती विश्वास गावकर यांनी दिली. डिचोली मतदारसंघातील पालिका आणि अन्य पाचही पंचायत क्षेत्रातील जनतेने या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिल्पा नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT