Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: कोठार्लीत दुचाकीचा अपघात; ट्रकखाली आल्याने युवक जागीच ठार!

Goa Accident: दुचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Accident: दाबामळ कोठार्ली येथे ट्रकखाली आल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. वेळीपवाडा कोठार्ली येथील लवलेश मनोहरच्यारी (25) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. लवलेश हा दुपारच्या सुमारास दुचाकीने (क्र. जीए-09 सी 1628) घरी जात होता.

दाबामळ कोठार्ली येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या वळणावर अवजड ट्रक (क्र.एमएच-42 बी 9277) पेप्सी कंपनीच्या दिशेने जात होता. यावेळी वळणावर अचानक समोरून येणाऱ्या ट्रकला पाहून लवलेश गडबडला. त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटून गाडीसह ट्रकखाली आला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. सांगे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी लवलेशने आपला 25 वा वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान, वळणावर असलेली झाडीझुडपे वेळीच कापली असती तर हा अपघात घडला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

युवकांनी अनेकदा शेळपे औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या वाहनांना गतीला आवर घालण्यासाठी आणि रस्त्याची साफसफाई करण्यासाठी सूचना केली होती. पण कंपनी सामाजिक कार्याला असहकार्य होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या विषयावरून गुरुवारी रास्ता रोकोचा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT