गोवा

Goa News: बागायतदार शेतकऱ्यांची नारळाकडे पाठ!

Goa News: धारबांदोडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीतील नारळ घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: सांगे, धारबांदोडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीतील नारळ घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सांगे येथील शांताराम गावकर म्हणाले, की गोव्यात मोठ्या प्रमाणात केरळातील नारळ येत आहेत.

गोव्यात येणारा केरळाचा नारळ बंद करावा व गोव्यातील शेतकऱ्यांचा नारळ बागायतदारने घ्यावा. माझ्याजवळ दोन हजार नारळ आहेत त्यासाठी मी फोंडा (Ponda) व कुडचडे यार्डातील बागायतदारमध्ये गेलो व नारळ देण्याचे सांगितले तेव्हा आम्ही सध्यातरी नारळ घेणार नसल्याचे उत्तर मिळाले.

स्वस्त दरात सुद्धा आम्ही बागायतदारमध्ये नारळ घालण्यास तयार आहे, पण ते घेण्यास बागायतदार तयार नसल्याने आम्ही त्या नारळांचे काय करावे, असा प्रश्न आमच्यापुढे आहे, असेही या शेतकऱ्याने सांगितले.

दाभाळ येथील शेतकरी वरद सामंत म्हणाले, की गोव्यातील काही शेतकऱ्यांच्या बागायतीत लाखो नारळ पाढा करतेवेळी पडायचे ते सर्व नारळ (Coconut) बागायतीत न घालता बाहेरच्या बाहेर घालायचे. जेव्हा सरकारने नारळाला योग्य दर व काही प्रमाणात अनुदान द्यायला सुरुवात केली तेव्हा लाखो नारळ बागायतदारमध्ये यायला लागले. आताही बागायतदाराने शेतकऱ्यांचा विचार करावा, असे सामंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT