Samagra Shiksha Abhiyan Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 200 कोटींचे कर्ज देतो म्हणून 1.85 कोटींचा गंडा! सांगेच्या उद्योजकाची फसवणूक; कर्नाटकातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sanguem Crime: सांगे येथे एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, २०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल १.८५ कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: गोव्यातील सांगे येथे एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, २०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाची तब्बल १.८५ कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणी सांगे पोलिसांनी कर्नाटकातील मंगळूर येथील पाच संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीची तक्रार अल्बिस ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक पियुष जारी यांनी दाखल केली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी मोठ्या कर्जाची सोय करून देण्याचे सांगून स्टॅम्प ड्युटी व इतर प्रक्रिया खर्चाच्या नावाखाली त्यांच्याकडून हप्त्याने पैसे घेतले. अखेर एकूण १ कोटी ८५ लाख रुपये घेतल्यानंतर या संशयितांनी उद्योजकाशी संपर्क तोडला.

या प्रकरणी योगेश सावंत, जयस्वाल, रोशन साल्ढाणा, आर. के. नायक आणि रेड्डी या पाच जणांविरोधात फसवणुकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

हा प्रकार म्हणजे उद्योगपतींना कर्जाच्या आमिषाने जाळ्यात ओढणाऱ्या टोळ्यांचे वाढते प्रमाण अधोरेखित करणारा असून, व्यावसायिकांनी अशा व्यवहारांमध्ये अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अरे हिरो...! रोहित शर्मा नवीन कर्णधार शुभमन गिलला पहिल्या भेटीत काय म्हणाला? विराट कोहलीला गाडीत बसलेलं पाहिलं अन्... Video Viral

Davorlim Panchayat: ''भाजपचं गलिच्छ राजकारण चाललंय'', शेवटच्या क्षणी पंचायत निवडणूक रद्द! दवर्ली पंचायतीत हाय व्होल्टेज ड्रामा

Viral Video: पॉईंट ब्लँकवरुन आठ लोकांना भर चौकात घातल्या गोळ्या; हमासच्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ समोर Watch

ICC Ranking: ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी टीम इंडियाला झटका! विराट-रोहितला रँकिंगमध्ये मोठे नुकसान, शुभमन गिलचे पहिले स्थान धोक्यात

Cardiac Arrest : पायांच्या नसा देतात महत्त्वाचे संकेत! कार्डिॲक अरेस्टच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; जाणून घ्या कारणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT