Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Irani Chain Snatch Arrested: उत्तर गोवा पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात इराणी गँगचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात इराणी गँगचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलिसांनी विशेष पथक तयार करत तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवत दोन संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली की, हे दोघं इराणी टोळीचे सदस्य असून, ते दिवसा गोव्यातील गर्दीच्या भागात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून रात्रीच्या वेळी महाराष्ट्रात पसार व्हायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Jail Drug Case
Morjim Drugs Bust
Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Goa Spa Owner Rape Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com