Sangmpur Lottery Coupon Dainik Gomantak
गोवा

Sangmpur Lottery Coupon: संगमपूर गणेशोत्सवाच्या सोडत कुपनसाठी भाविकांची गर्दी, अवघ्या एकवीस दिवसांत कुपन संपल्या

गोमन्तक डिजिटल टीम

Sangmpur Lottery Coupon सांगे येथील संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला साठावा सार्वजनिक उत्सव साजरा करीत आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंडळ आहे. या मंडळाने काढलेली सोडत कुपन यंदा अवघ्या एकवीस दिवसांत संपल्याने खास पत्रकार परिषद घेऊन गणेशभक्तांचे आभार मानले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष रूपेश नाईक म्हणाले की, साठ हजार कुपन अवघ्या एकवीस दिवसांत विकली गेली आहेत. अजून चतुर्थीला दहा दिवस व चतुर्थीचे अकरा दिवस म्हणजे निकालाला एकवीस दिवस बाकी असताना सर्व कुपन विक्री झाल्या आहेत.

सोडत कुपनावर ट्रक, बस, महागडी वाहने भेट देण्याची परंपरा कायम राखत यंदा प्रथम बक्षीस जेसीपी यंत्र ठेवले आहे. त्यामुळे सोडत कुपनाना मागणी वाढली. इतक्या लवकर कुपन विक्री होईल याचा मंडळाला अंदाज नव्हता, असे रूपेश नाईक यांनी सांगितले.

मंडळाचे खजिनदार ॲड. तुषार करमळकर म्हणाले की, मंडळाने यंदा विजेत्यांना गिफ्ट टॅक्स माफ केला आहे. पुढील वर्षी गिफ्ट टॅक्स बरोबरच गाडीचा विमा, रोड टॅक्स भरून एक रुपया सुद्धा न भरता बक्षीस घेऊन जाण्याची योजना आखली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

सचिव लक्ष्मण नाईक म्हणाले की, अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने मंडळ सर्वांना धन्यवाद देत आहे. या पुढेही मंडळाला असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातील कलाकारांना संधी देण्यासाठी मंडळाने कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT