goa sand mining issue reached pm modi Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mining: रेती उत्खननासाठी योग्य तोडगा काढा, प्रश्‍‍न पंतप्रधानांच्या दरबारी; 'सीआरझेड' नियमांमुळे उत्खनन ठप्प

goa sand mining issue reached pm modi: रेती उत्खननाचा प्रश्‍‍न थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारी पोहोचला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील रेती उत्खननाचा प्रश्‍‍न थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारी पोहोचला असून, सीआरझेड नियमांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्यात मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध असूनही विविध प्रादेशिक अडचणी आणि सीआरझेड नियमांमुळे रेती उपसा करता येत नसल्याने बांधकाम क्षेत्रासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील नद्या ‘सीआरझेड-४’ क्षेत्रात मोडत असल्याचे स्पष्ट करत त्या भागात रेती उत्खननास परवानगी देता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे खाण खात्याने रेती उपशासाठी सादर केलेले अर्ज प्रलंबित असून, नव्या परवान्यांची प्रक्रिया जवळपास ठप्पच आहे. आता हा विषय पंतप्रधानांपर्यंत -2123aq;,lf/.fewFDVC पोचल्याने निदान पावसाळ्यानंतर रेती काढण्यासाठी परवाने देण्याची प्रक्रिया खाण खाते सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले...

गोव्यात रेती उपलब्ध असली तरी नियमांमुळे ती वापरता येत नाही आणि परिणामी राज्याला शेजारील राज्यांतून रेती आयात करावी लागते.

सीआरझेड नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यास गोव्याला बाहेरील रेतीवर अवलंबून राहावे लागणार नाही.

राज्य सरकारने केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाकडे यापूर्वी दोनवेळा नियम दुरुस्तीची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

यापूर्वी पर्यावरणीय दाखल्यासाठी ‘सीआरझेड’चा ना हरकत दाखला आवश्यक नसल्याची अट होती. मात्र, आता नव्या अर्जांवर निर्णय घेताना हा दाखला अनिवार्य असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्यानंतर ही समस्या निर्माण झाली आहे.

परिणामी, पर्यावरणीय परवानगी आणि रेती परवाने या दोन्ही प्रक्रिया अडचणीत सापडल्या आहेत. राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सीआरझेड क्षेत्रातील मांडवी, झुआरी, शापोरा नद्यांमधून रेती उपसा बेकायदा असल्याचे मान्य केल्याने हा विषय गुंतागुंतीचा झाला आहे.

अंदमान-निकोबार बेटांसाठी ज्याप्रकारे विशेष तरतूद केली होती, त्याच धर्तीवर गोव्यासाठीही स्वतंत्र सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गोव्यातील बहुतांश नद्या भरती-ओहोटीच्या प्रभावाखाली असल्याने येथे नदीपात्रातील पाण्याखालून रेती काढावी लागते. इतर राज्यांप्रमाणे सुक्या नदीपात्रातील उत्खनन येथे शक्य नसल्याने गोव्याची परिस्थिती वेगळी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT