Goa sand mafia news Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mafia Raj: गोव्यातील गोळीबाराची देशात चर्चा; 'एक्स'वर वाळू माफिया राज हॅशटॅग ट्रेन्डिंग

Goa sand mafia news: न्यायालयाच्या आदेशानुसार वाळू उपसा करण्यास बंदी असताना देखील बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरु असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

Pramod Yadav

पणजी: राज्यातील पेडणे तालुक्यात रेती उपसाप्रकरणी मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन कामगार जखमी झाले. राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना देशात देखील या घटनेवरुन चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, गोवा वाळू माफिया राज हा हॅशटॅग ट्रेन्डिग होत आहे.

पोरस्कडे – उगवेच्या सीमारेषेवर तेरेखोळ नदीकिनारी ही घटना घडली. यात रामसिऱी रामराज पासवान आणि लाल बहादूर गोंड (दोघेही रा. बिहार) गंभीर जखमी झालेत. यापैकी पासवानची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले जाते. पेडणे पोलिसांनी याप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पण, या घटनेमागील मुख्य सुत्रधार अद्याप हाती लागलेला नाही. या घटनेवरुन विरोधकांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला आहे. तर, मुख्यमंत्री सावंतांनी कडक कारवाईचे निर्देश दिलेत.

"कधीकाळी आनंदी भूप्रदेश म्हणून ओळखला जाणारा गोवा आता समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. तो काळ आठवला जेव्हा गोव्यातून फक्त चांगल्या बातम्या ऐकू येत होत्या, आता परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. बेकायदा रेती उपसा, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराचा गाजावाजा सुरु आहे", असे मत अंकीत दुबे यांनी मांडले केले आहे.

“अवैध रेती उपश्याखाली गोव्याचे सौदर्य दाबले जातेय. आमच्या जमिनींची लूट करणाऱ्यांपासून आमचे रक्षण कोण करणार?”, असा सवाल गोपी शर्मा या नेटकऱ्यांने उपस्थित केला आहे.

राज्यात अशा घटना घडत असताना गोवा सरकार काय करतंय?, असा सवाल देखील एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.

राज्यातील नदींचा ऱ्हास होण्यापूर्वी सरकारला जाग येईल, अशी आशा आहे. पर्यावरण अभ्यासकांनी यापूर्वी अनेकवेळा याबाबतचा धोका बोलून दाखवला आहे. राज्यातील जैवविविधता, जमीन आणि जैव साधनसंपत्ती धोक्यात असल्याचा इशारा देण्यात आल्याचे मत दुसऱ्या एका नेटकऱ्याने व्यक्त केले आहे.

राज्यातील खारफुटी धोक्यात आहे, नदी किनारे आणि समुद्र किनाऱ्यांची धूप होत आहे. मात्स्य व्यवसायावर धोक्याचे वादळ आहे, असे मत एकाने नोंदवले आहे.

राज्यातील गोळीबाराच्या घटनेचे गोव्यासह देशात चांगलेच पडसाद उमटल्याचे दिसत आहे. सोशल मीडिया एक्सवर गोवा वाळू माफिया राज (#Goasandmafiaraj) हा हॅशटॅग वापरुन आत्तापर्यंत 4,696 पोस्ट करण्यात आल्या आहेत. विविध पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार वाळू उपसा करण्यास बंदी असताना देखील बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरु असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT