साखळीनं बांधून मारहाण केली, 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आईने फोडला हंबरडा; मडगाव पोलिसांवर केले गंभीर आरोप

Margao police assault case: त्याला लकवा देखील जाऊ शकतो आणि त्याचा डाव्या बाजुला फटका बसू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
Margao Police Accused of Brutality | Goa News
Margao police assault caseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मुलाला मडगाव पोलिस स्थानकात साखळीने बांधून गंभीर मारहाण केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आणि आता डॉक्टरांनी त्याला पॅरालिसिस होण्याची भीती व्यक्त केली आहे, अशी कैफीयत इडबर्ग परेराच्या आईने मांडली. याप्रकरणी मडगाव पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

जखमी इडबर्ग परेरा याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्या आईने सांगितले. सध्या डॉक्टरांनी त्याच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान, त्याला लकवा देखील जाऊ शकतो आणि त्याचा डाव्या बाजुला फटका बसू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती परेरा यांनी दिली.

Margao Police Accused of Brutality | Goa News
Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

परेरा यांनी त्यांच्या मुलाला मडगाव पोलिस स्थानकात साखळीने बांधून गंभीर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पाहिले त्यावेळी त्यांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले असाही त्यांनी आरोप केला. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी पोलिस स्थानकात काय झाले याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

जखमी मुलगा आयुष्याशी झुंज देत आहे. पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन हा प्रकरण थंड होण्यासाठी केलेला तात्पुरता उपाय आहे. याप्रकरणी निष्पक्ष आणि स्वतंत्र तपास करण्याची मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना इडबर्ग हा युवक पोलिस स्थानकात पडल्याने जखमी झाल्याचे म्हटले आहे. 

Margao Police Accused of Brutality | Goa News
कॅमरुन नागरिकाला शिवोलीत अटक, एक लाखांचे कोकेन, 6.81 लाखांची रोकड जप्त; लव्ह स्टोरी व्हिलाजवळ कारवाई

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टीकमसिंग वर्मा यांनीयाबाबत दिलेल्या माहितीनुसार, २२ तारखेला एक व्यक्ती दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. संशयित इडबर्गला पोलिस स्थानकात घेऊन आल्यानंतर देखील तो धिंगाणा घालत होता. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.

तो स्वत:च खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निलेश यांना निलंबित करण्यात  आले असून, अधिक तपास सुरु आहे. जखमी इडबर्ग याची तब्येत सध्या स्थीर असून, त्याच्यावर देखील योग्य उपचार सुरु असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com