Goa Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Extraction: इशारा दिला; पण होड्यांवर कारवाईसाठी अधिकारी फिरकलेच नाहीत...

न्हयबाग-पेडणे येथे बेकायदा रेती उपसाप्रकरणी होड्यांवरील कारवाईबाबत गूढ

दैनिक गोमंतक

Goa Sand Extraction: बेकायदा रेती उपसाप्रकरणी ताब्यात घेतलेल्या होड्यांपैकी गजानन तेली यांच्या मालकीची होडी खाण व उद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी न्हयबाग येथे तोडली होती.

अशाच प्रकारे ताब्यात घेतलेल्या अन्य होड्यांवर आज (27 रोजी) कारवाई करणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता.

पण प्रत्यक्षात आज खाण व उद्योग खात्याचे अधिकारी फिरकलेच नसल्याने मंगळवारी गजानन तेली यांच्या एकाच होडीवर कारवाई का केली, असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत.

खाण व उद्योग खात्याचे अधिकारी बुधवारी दुपारी 3 वाजता पोलिस संरक्षणात उर्वरित 25 होड्या तोडणार, असे कालच जाहीर केले होते.

कारवाईची टांगती तलवार कायम

मंगळवारी संध्याकाळी खाण व उद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी गजानन तेली यांच्या मालकीची होडी मोडली होती. त्यामुळे अन्य होडीधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खाण व उद्योग खात्याचे अधिकारी केव्हा येऊन कारवाई करतील, याची शाश्वती नसल्याने कारवाईची टांगती तलवार आमच्या माथ्यावर आहे.

या अधिकाऱ्यांनी जरी आज येऊन कारवाई केली नसली तरी आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखा हा प्रकार आहे, असे मत रेती व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT