Sand extraction in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sand extraction: पुराव्यांनिशी माहिती देऊनही कारवाई नाही

पर्यावरणप्रेमींची खंत: वाळू माफियांमुळे जनतेत दहशत

दैनिक गोमन्तक

पणजी: न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा राज्यात अवैधरित्या रेती उपसा अजूनही सुरूच आहे. गोमन्‍तक टीव्हीच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमांमध्ये या मुद्द्यावर दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रेती उपसावर आवाज उठवणारे विराज बाक्रे आणि पर्यावरणप्रेमी अभिजीत प्रभुदेसाई यांनी आपले मत नोंदवले आहे. त्यात त्यांनी आपण सर्व पुराव्यांनिशी सरकारला माहिती देऊनसुद्धा या प्रकरणावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

प्रभुदेसाई म्हणाले की, वाळू माफियांमुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. याचे कारण म्हणजे हे लोक सामान्यांना धमकवण्यातही मागे पडत नाहीत. रेती उपसामध्ये शेकडो कोटींची उलाढाल केली जाते. पण यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. यामुळेच सरकारचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

शिवाय या सततच्या वाळू उपसामुळे याचा एकंदरीत परिणाम गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर सुद्धा होत आहे. ही महत्त्वाची बाब असून सरकारने यावर गंभीर विचार करणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणामध्ये झाल्यास त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार नाही. पण आत्ता सुरू असलेला वाळू उपसा थांबणे गरजेचे आहे कारण नदीमध्ये येत असलेली वाळू ही डोंगरवरून येत असते. या सगळ्याची विशिष्ट अशी एक प्रक्रिया असते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे नदीतील वाळूचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. त्यामुळे निदान पुढील काही वर्षे गोव्यातील वाळू उपसा थांबवला गेला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT