Sancoale  Dainik Gomantak
गोवा

Sancoale: रात्रीची वेळ, चर्चसमोर विजयादुर्गेची मूर्ती आणि शेवटी पोलिस घटनास्थळी दाखल; सांकवाळमध्ये 'रात्रीस खेळ चाले...'

पोलिसांनी त्वरित कृती करून प्रतिमा उचलल्याने अनर्थ टळला

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale सांकवाळ येथील कपेलच्या प्रांगणात देवीच्या मूर्तीची रातोरात स्थापना करण्याचा प्रकार भल्या पहाटे पोलिसांनी मोडून काढल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत व सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा कडक इशारा दिला.

‘गोमन्तक’शी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, झालेल्या घटनेची पोलिसांनी मला माहिती दिल्यानंतर ती मूर्ती, ताबडतोब तेथून हलविण्याचा आदेश दिला.

सूत्रांच्या मते पहाटे तीन वाजता सांकवाळ येथील कपेलच्या प्रांगणात मूर्ती आणून ठेवली आहे व तेथे लोक असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. ही मूर्ती आणून सध्या वेर्णा पोलिस स्थानकात ठेवण्यात आली आहे.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी कपेलच्या प्राकारात ही विजयादुर्गा देवीची मूर्ती ठेवली, त्यांनी तसे जाहीरपणे व्हिडिओत सांगितले आहे. ‘करणी सेना’ नामक संघटना या प्रकारामागे असल्याचा दावा त्यांनी केला असून तसे जाहीरपणे ‘करणी’चे प्रमुख संजयसिंह रजपूत सांगताना व्हिडिओत दिसतात.

‘करणी’चे प्रमुख व काही हिंदुत्ववादी घटकांनी यापूर्वी सांकवाळ येथील भग्नावस्थेतील चर्च हे पुरातन लक्ष्मीनृसिंहाचे देऊळ असल्याचा दावा केला होता. काही घटकांनी या प्राकारात घुसून यापूर्वी पूजाअर्चा करण्याचाही प्रकार केला होता व स्थानिक संघटनांनी त्यांच्या कृत्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

१६०६ मध्ये स्थापन करण्यात आलेले सांकवाळ चर्च हे अवर लेडी ऑफ सेक्रेड हार्ट चर्च म्हणून नावाजलेले होते, परंतु तेथील जमिनीसंदर्भात काही वाद आहेत. परंतु २०२०मध्ये काही संघटनांनी तेथे पूर्वी देऊळ होते, असे सांगून वाद उकरून काढला आहे.

१८३४ व १८३९ साली या चर्चवर दोनवेळा वीज कोसळली होती. तेव्हापासून तिचे केवळ भग्नावशेषच शिल्लक आहेत. ही सध्या संरक्षित वारसा इमारत मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT