Sakshi Kale Dainik Gomantak
गोवा

Sakshi Kale: भारतीय खुली पॅरा अ‍ॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा; गोव्याच्या साक्षीला सुवर्णासह तीन पदके

6th Indian Open Para Athletics International Championship: बंगळूरमधील स्पर्धेत सहभागी झालेली ती गोव्याची एकमेव महिला पॅरा अ‍ॅथलीट होती.

किशोर पेटकर

6th Indian Open Para Athletics International Championship

गोव्याची हरहुन्नरी पॅरा अ‍ॅथलीट साक्षी काळे हिने सहाव्या भारतीय खुल्या पॅरा अ‍ॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टी-12 (अंधत्व) प्रकारात सुवर्णासह एकूण तीन पदके जिंकली. स्पर्धा बंगळूरमधील श्री कांतीरवा स्टेडियम संकुलात झाली.

उसगाव येथील 19 वर्षीय साक्षी लांबउडीत विजेती ठरली. या सुवर्णपदकाव्यतिरिक्त तिने 100 मीटर शर्यतीत उपविजेतेपदाचे रौप्यपदक, तर 200 मीटर शर्यतीत तिसऱ्या क्रमांकासह ब्राँझपदक पटकावले.

बंगळूरमधील स्पर्धा भारतीय पॅरालिंपिक समितीतर्फे घेण्यात आली होती. साक्षी खांडोळा सरकारी महाविद्यालयात शिकते. बंगळूरमधील स्पर्धेत सहभागी झालेली ती गोव्याची एकमेव महिला पॅरा अ‍ॅथलीट होती.

गतवर्षी बंगळूर येथेच झालेल्या पाचव्या इंडियन ओपन पॅरा अ‍ॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत साक्षीने महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. तिचे ते पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT