Bicholim Awareness workshops  Dainik Gomantak
गोवा

Goa: 'सुरक्षित मातृत्व, गरोदर काळातील लसीकरण'; डिचोलीत जागृती कार्यशाळा

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या (Social Health Center) सहकार्याने शांतारामनगर-बोर्डे येथील दीनानाथ तारी सभागृहात या जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

डिचोली: 'सुरक्षित मातृत्व आणि गरोदर काळातील लसीकरण' या विषयावरील एक जागृती कार्यशाळा डिचोलीत (Bicholim) उत्साहात पार पडली. भारतीय वैद्यकीय संघटना आणि डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने शांतारामनगर-बोर्डे येथील दीनानाथ तारी सभागृहात या जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहूणे डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी 'आयएमए'च्या डिचोली शाखेच्या अध्यक्ष तथा सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर, सदस्य डॉ. कौस्तुभ पाटणेकर,'आयएमए'चे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर (Dr. Shekhar Salkar) डॉ. मिथुन महात्मे, अर्चना गायतोंडे आणि विश्वास गावस उपस्थित होते.

डॉ. मिथुन महात्मे यांनी 'सुरक्षित मातृत्व' याविषयी महिलांना उपयुक्त माहिती दिली. 'गरोदरपणात लसीकरण' आणि याविषयी डॉ. मेधा साळकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शेखर साळकर आणि डॉ. कौस्तुभ पाटणेकर (Dr. Kaustubh Patnekar) यांनी महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT