पणजी: गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून, गोव्याला प्राधान्य दिलं जातं. गोवा सरकारच्या प्रशासनात सुरक्षितता आणि संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. १३६४ पर्यटक हेल्पलाइन आणि पिंक फोर्स यांसारख्या उपक्रमांमधून गरजूंना, विशेषतः महिलांना त्वरित मदत आणि सुरक्षा पुरवण्याची राज्य कायमच कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
"आमच्या पर्यटन धोरणाच्या केंद्रस्थानी सुरक्षितता आहे. पोलिसांचे मजबून नेटवर्क, जलद प्रतिसाद पथके आणि तंत्रज्ञान-आधारित उपक्रमांद्वारे, गोवा सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित केंद्र बनतोय तसेच पर्यटकांची सुरक्षा राज्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचं खंवटे म्हणालेत.
पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, गोव्यात महिलांची सुरक्षा ही देखील सर्वोच्च प्राथमिकता आहे, विशेषतः प्रवाशांची वारंवार ये-जा असलेल्या भागात महिला सुरक्षित असाव्यात म्हणून विभाग कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रमुख पर्यटन क्षेत्रे, सार्वजनिक ठिकाणे आणि वाहतूक केंद्रांवर सतत गस्त घातली जाते. हे गस्ती पथक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आणि अडचणीत असलेल्या महिलांना थेट मदत करण्यासाठी प्रशिक्षित आहे.
"पिंक फोर्सच्या दृश्यमान उपस्थितीमुळे पर्यटक आणि स्थानिक महिला अधिक सुरक्षित असल्याचा अनुभव घेतायत आणि यामुळे गोवा एकटे प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित स्थळ बनले आहे," असे नाईक म्हणाले. पर्यटन विभाग पर्यटन स्थळांचे सौंदर्य वाढवण्यासाठी धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करत आहे.
नार्वे येथे मांडवी, जुवारी आणि वाळवंटी नदीच्या संगमावर गोमंत सरिता पूजन सुरू केल्याने गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.