Davorlim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Murder Case: बेळ्‍ळारी खून : आणखी दोघांना अटक तर अजूनही एक संशयित फरार

एकजण फरार : खुनासाठी वापरलेला कोयता पाडी येथून जप्‍त

गोमन्तक डिजिटल टीम

Rumdamol Murder Case मडगाव,रुमडामळ-दवर्ली येथील सादिक बेळ्‍ळारी खून प्रकरणातील फरार संशयित जावेद पानवाले आणि सुलेमान या दोघांना मायणा-कुडतरी पोलिसांनी आज (बुधवारी) अटक केली. हा खून झाल्‍यानंतर हे दोघे फरार झाले होते.

दोन दिवसांपूर्वी मायणा-कुडतरी पोलिसांनी जावेदचा भाऊ रियान याला याप्रकरणी अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून एक संशयित अजूनही फरार आहे.

1सप्‍टेंबर रोजी सादिकचा खून करण्‍यात आला होता. सुरवातीला या प्रकरणात कादर खान आणि तौसिफ कडेमणी या दोघांना अटक केली होती. हा खून कादर खान याने केला असला, तरी या खुनाचे कारस्‍थान रचण्‍यात इतर संशयितांचे संंबंध असल्‍याचे उघड झाले आहे.

जावेद पानवाले आणि सुलेमान या दोघांना या खुनाच्‍या कटात सामील असल्‍याच्‍या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे.

गर्द झाडीत टाकला कोयता

हा खून करण्‍यासाठी ज्‍या कोयत्‍याचा वापर केला, तो पाडी येथील जंगलातून पोलिसांनी जप्‍त केला. खून केल्‍यानंतर कादर खान आणि तौसिफ हे दुचाकीवरून सौनूरला गेले होते.

वाटेत पाडी येथे त्‍यांनी हा कोयता गर्द झाडीत टाकून दिला. मंगळवारी मायणा-कुडतरी पोलिसांनी आराेपींनी दाखविलेल्‍या ठिकाणी जाऊन हा कोयता जप्‍त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT