Banastarim Bridge Accident बाणस्तारी प्रकरणाचा सविस्तर अपघात अहवाल (डीएआर) तपास अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार येत्या 60 दिवसांत सादर केल्यानंतर 2 कोटींच्या भरपाईव्यतिरिक्त पीडित कुटुंबीयांकडून सादर करण्यात येणाऱ्या भरपाईच्या दावे अर्जावरील सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोटार अपघात दावे लवादाला दिले आणि मेघना सावर्डेकर हिने समन्सला आव्हान दिलेली याचिका निकालात काढली.
जखमींच्या भरपाईत वाढ
शंकर हळर्णकर आणि वनिता भंडारी हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी देऊन उर्वरित 25 लाख या दोघांना देण्याची विनंती केली.
त्यानुसार न्यायालयाने शंकर यांना 25 ऐवजी 40 लाख, तर वनिता यांना 25 ऐवजी 35 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले.
दिलासा : ही भरपाई मृत व जखमी कुटुंबीयांकडून लवादाकडे केलेल्या भरपाई दावे प्रकरणाशी संबंधित नसेल.
ही दोन कोटींची रक्कम न्यायालयात जमा केल्याने संबंधित कुटुंबीयांच्या वारसाला भरपाईची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख
उच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी दिलेल्या निर्देशानुसार अपघातग्रस्त मर्सिडीस कारची मालकीण मेघना सावर्डेकर हिने २ कोटी रुपये भरपाईपोटी जमा केले.
त्यातील ५० लाख रुपये मृत्यू झालेल्या फडते दाम्पत्याच्या कुटुंबीयाला, ५० लाख रुपये अरूप करमाकर याच्या कुटुंबातील पालक व भावाला तसेच जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.