Goa | ONGC Dainik Gomantak
गोवा

Goa: 'ONGC'अधिकाऱ्यांनी मंत्री तुमच्या दारी वेळी सरपंचांना रोखले

Goa: 'ओएनजीसी'ने स्थानिक सरपंच, पंच सदस्य आणि पत्रकारांसह ग्रामस्थांना फाटकाबाहेर अडविले.

दैनिक गोमन्तक

Goa: ‘मंत्री तुमच्या दारी’या उपक्रमांर्गत पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या भेटीवेळी सोमवारी बेतुल येथे ‘ओएनजीसी’च्या (Oil and Natural Gas Corporation) अधिकाऱ्यांनी स्थानिक सरपंच, पंच सदस्य व पत्रकारांसह ग्रामस्थांना फाटकाबाहेर अडविले.या प्रकारामुळे संतप्त केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालून मत्र्यांना याप्रकरणी जाब विचारला .

पर्यटन मंत्र्यांबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral), समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा, अधिकारी व स्थानिक स्वराज संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री खंवटे (Rohan khaunte) जेव्हा बेतुल येथे ‘ओएनजीसी’ ला भेट देण्यासाठी गेले तेव्हा ओंएनजीसीच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक सरपंच , लोक प्रतिनिधी व पत्रकारांना प्रवेशास मनाई करण्यात आली. कुंकळ्ळी पोलिसांनी सर्वांना फाटकाबाहेर अडवून ठेवले.केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या ‘ओएनजीसी’च्या या अपमानास्पद कृतीमुळे संतप्त झालेले केपेचे आमदार एल्टन यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालून मंत्र्यांना जाब विचारला.

‘ओएनजीसी’ च्या कृतीवर मंत्री खवंटे यांनीही नाराजी व्यक्त केली.जे घडले ते दुर्दैवी असून लोकप्रतिनिधींना अडविण्याचा अधिकार ‘ओएनजीसी’ला नाही. आपण यावर उप जिल्हाधिका-यांना चौकशीचे आदेश दिले असून ज्यांनी हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई केली जाईल,असे खवंटे यांनी सांगितले.

बेतुलच्या सरपंचांनी की ओएनजीसीचे गेट स्थानिकांसाठी वाघा बॉर्डर सारखे आहे. या प्राधिकरणाचा तुघलकी कारभार चालत असून जनतेला सोडाच लोकप्रतिनिधींनाही आत घेतले जात नाही. तिथे चालत असलेला गैरकारभार जनतेला व पत्रकारांना समजेल, म्हणूनच अधिकाऱ्यांनी अडवले.

दरम्यान, मंत्री खवंटे यांनी श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण संस्थान, श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानांना भेट दिली.मोरपिर्ला व बार्शे पंचायत (Panchayat) क्षेत्राचा दौरा करून खंवटे यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. बेतुल येथील शिवरायांच्या किल्ल्यावर पर्यटन दृष्ट्या काय विकास करता येईल, यावर आपले खाते विचार करणार असल्याचे खवंटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT