Ibrampur Dainik Gomantak
गोवा

Goa: इब्रामपूर भागात मंत्र्यांची रस्तेवारी; मदतीविनाच परतले माघारी

काल 23 रोजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgaokar) यांनी इब्रामपूर येथे भेट दिली मात्र त्यांनी रस्त्यावर राहून मोजक्याच लोकांकडे चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: इब्रामपूर (Ibrampur) येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती बागायतीचे नुकसान झाले आणि अनेकांचा घरात पाणी गुसले, त्या घरात राहणे म्हणजे घराच्या भिंती कोसळून दुर्घटना घडू शकते , मातीच्या भिंतीला फुग आली आहे . झोपायला जेवण करायला सुरक्षित जागा नाही ,अशी स्थिती असून सरकारी यंत्रणेकडून त्याना आजपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. काल 23 रोजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgaokar) यांनी इब्रामपूर येथे भेट दिली मात्र त्यांनी रस्त्यावर राहून मोजक्याच लोकांकडे चर्चा केली. ज्यांच्या घरात पाणी शिरले. त्याची स्थिती भयानक आहे,त्यांना अजूनपर्यंत कुणी सरकारी यंत्रणेने मदत केली नाही.

आज प्रत्यक्ष इब्रामपूर भागात मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर व कार्यकर्त्यांनी जशी ढोपर भर पाण्यातून काल घराघरात भेट देवून विचारपूस केली तशीच आज २४ रोजी कोरगावकर यांनी कार्यकर्त्यासोबत भेट दिली विचारपूस केली , त्यावेळी नागरिकांनी आपल्या कैफियती मांडताना मंत्री आले होते हे आम्हाला आज सकाळी कळले ते रस्त्यावर आले आणि गेले , आमच्या घरांची स्थिती कुणीही पाहिली नाही , सकाळी तलाठी आला धावती भेट घेवून कोणकोणत्या सामानाची नुकसानी झाली त्याची विचारणा केली . २३ रोजी जी रात्रीची घटना घडली त्यावेळी मात्र सरकारी यंत्रणा आलीच नाही .मात्र स्थानिकांनी मदत केली . सरकारी यंत्रणा आणि आमदार मंत्रीही कमी पडले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

मागच्या दोन वर्षापूर्वी कोसळलेले घर

मागच्या दोन वर्षापूर्वी याच भागात महापूर येवून मठकर या कुटुंबियांचे पूर्ण घर जमीनदोस्त झाले होते त्यावेळी मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपये मदत मिळाली , एका कुटुंबात ५० सदस्य असलेले घर आणि सरकारकडून एक लाख रुपये ते आजही बँक मध्ये ठेवलेले आहे , घर आजही उभे राहिले नाही , त्यावेळी मंत्री आमदार अनेक नेत्यांनी भेट देवून मदत करण्याचे आश्वासन दिले मात्र आजपर्यंत कोणीच मदत केली नाही , व घर उभारण्यासाठी आमची आर्थिक स्थिती नसल्याने आम्ही ते घर उभारू शकत नाही ,असे मठकर कुटुंबीयांनी सांगितले.

दरवर्षी हि पूरग्रस्त स्थिती निर्माण होवून नुकसानी होती , आम्ही घरासहित स्थलांतरित व्हायला तयार आहे मात्र सरकारने आमच्यासाठी योजना राहून कायमस्वरूपी संकटातून मुक्तात्ता करावी अशी मागणी केली आहे. शात्ताराम नागेश शिरोडकर यांनी प्रतिक्रिया देताना आमची शेती , बागायतीचे पंप गेले त्यातून किमान दोन लाख रुपये नुकसानी झाली आहे , एका घराच्या भिंतीला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.येथील स्थितीचा आढावा घेतला तर अनेक घरात पाणी साचून असल्याने सर्व सामान तर खराब झाले , शिवाय जी घरे मातीची आहे त्याना अधिका धोका अजूनही आहे.

घरातील जमिनी चिखलमय झाल्या आहेत ,घरात जेवण तयार करायचे कोणतेही समान सुरक्षित नाही , मातीच्या असलेल्या भिंतीना धोका कायम आहे. या भागाची सलग दोन दिवस मिशन फॉर लोकल चे राजन कोरगावकर यांनी देवून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेवून योग्य ती मदत देण्याची ग्वाही दिली. खासदार योजनेतून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर गाव आदर्श गाव करण्यासाठी दत्तक घेतला होता ,या गावाची तीन वर्षापासून जी पडझड आहे आणि येथली लोकवस्ती आहे ती अजून सुधारलेली नाही , गरिबांची घरे अजूनही मातीचीच आहे त्या घरापर्यंत विकास पोचला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT