Goa Floods: सारमानस येथील पूरस्थिती नियंत्रणात; भीती कायम

डिचोलीतील सारमानससह अन्य ठिकाणी धुवांधार पावसामुळे पहाटे नदीचे पाणी वाढून या भागातील लोकवस्तीत घुसले.
Goa Floods
Goa FloodsDainik Gomantak

डिचोली : कालपासून पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरग्रस्त (Goa Floods) स्थिती निवळत असली, तरी घरांदारांनी चिखल आदी कचरा साचल्याने सध्या पूरग्रस्तांसमोर चिखल साफ करण्याचे आव्हान आहे. डिचोलीतील सारमानससह अन्य ठिकाणी ही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, पूर ओसरला असला, तरी सारमानस येथील पूरग्रस्त पुराच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. अद्यापही ते भीतीच्या सावटाखाली आणि चिंतेत आहेत.

Goa Floods
God Floods: समुद्राच्या पाण्याला रोखणार कोण?

कोसळधार पावसामुळे काल मांडवी नदीकाठी वसलेल्या पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस भागाला पुराचा तडाखा बसून, तेथील दोन घरे पाण्याखाली आली होती. सारमानसहून पिळगावला जोडलेला 'शॉर्टकट' रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला.

पाणी लोकवस्तीत घुसले

धुवांधार पावसामुळे पहाटे नदीचे पाणी वाढून पाणी सारमानस भागातील लोकवस्तीत घुसले. येथील मंगला उसपकर आणि नलिनी कवळेकर यांच्या घरांनी पाणी घुसले. पाण्याची पातळी वाढू लागताच घरातील लोकांनी घराबाहेर धाव घेतल्याने मोठे संकट टळले. सकाळ ते सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पाण्याची पातळी कमी झाली नव्हती. त्यामुळे रात्रीपर्यंत सारमानस भागात भिती कायम होती.

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पाहणी करतांना
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पाहणी करतांनाDainik Gomantak
Goa Floods
Goa Floods Updates: ग्रामीण गोवा पाण्यात, लोकांचा जीव मुठीत, इंटरनेट सेवा बंद

घरांमध्ये साचलाय चिखल

घरांनी पाणी शिरलेल्या एका कुटुंबाला रात्री उशिरा आपत्कालीन यंत्रणेने पिळगाव येथील सोसायटीच्या सभागृहात स्थलांतरीत केले. आज (शनिवारी) सकाळपर्यंत घरांतील पाणी ओसरले असले, तरी या घरांनी चिखल साचल्याने समस्या निर्माण झाली आहे. घरातील सामानाचीही नासधूस झाल्याने पूरग्रस्तांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसाचा जोर वाढला नाही, तर परिस्थिती हळूहळू जाग्यावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक पंच अनिल नाईक यांनी पुढाकार घेवून तेथील सेझा कंपनीच्या टँकरच्या मदतीने सारमानस भागात सकाळी पाणी पुरवठा करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, काल सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सारमानस येथे जावून पूरग्रस्त घरांची पाहणी केली. पूरग्रस्तांना तातडीची मदत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनीही सायंकाळी पुराचा तडाखा बसलेल्या सारमानसह मये मतदारसंघातील विविध भागांना भेट दिली. सारमानस भागातील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com