Goa Fatal Accident: Dainik Gomantak
गोवा

Goa Fatal Accident: पर्वरीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Goa Fatal Accident: राहुल खडपे याला गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Ganeshprasad Gogate

Goa Fatal Accident: आठवड्याच्या सुरुवातीलाच रस्ते अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. राहुल खडपे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

या घटनेसंबंधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पर्वरी सुकूर दत्तमंदिर येथे हा अपघात घडला असून रितेश कांबळे (वय 46. रा. पर्वरी) हा आपल्या ताब्यातील हिरो होंडा ग्लॅमर बाईक घेऊन सुकूर पंचायतीकडून चर्चकडे जात होता.

तर त्याचवेळी राहुल खडपे (वय 31 रा. 20 पॉईंट पर्वरी) हा आपल्या ताब्यातील केटीएम बाईकने चर्चकडून पंचायतीकडे जात होता.

सुकूर दत्तमंदिर येथे पोहोचताच त्या दोघांची एकमेकांना धडक बसली. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी दोघानांही तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल धाव घेतली.

राहुल खडपे याला गोवा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रितेश कांबळे याचीही प्रकृती गंभीर असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनांसाठी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.

हे दोन्ही दुचाकीस्वार भरधाव वेगात असल्यानेच हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान काल रविवारी (14 जानेवारीला) सिर्ली धर्मापूर येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने कार झाडावर आदळून चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

गोव्यात रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात वाहतुकीचे नियम न पाळल्यानेच असे अपघात घडत असल्याचे दिसून आलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT