Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: अतिवेगामुळे राज्‍यात दरमहा सरासरी 19 जणांचा मृत्‍यू! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राज्‍यसभेत माहिती

Goa Accident Case: महिन्‍याला सरासरी २०४ अपघात घडत असून, त्‍यात १९ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे केंद्रीय रस्‍ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आलेले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अतिवेगाने वाहने चालवल्‍यामुळे राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला सरासरी २०४ अपघात घडत असून, त्‍यात १९ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे केंद्रीय रस्‍ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आलेले आहे.

२०२० ते २०२४ या चार वर्षांच्‍या काळात राज्‍यात अतिवेगाने वाहने चालवल्‍यामुळे एकूण १२,२५४ अपघात घडले. त्‍यात १,१६५ जणांचा मृत्‍यू झाल्‍याचे मंत्री गडकरी यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

यातून अतिवेगाने वाहने चालवल्‍यामुळे राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला १९ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. या पाच वर्षांच्‍या काळात राज्‍यात जे १३,७६३ अपघात होऊन त्‍यात १,२९६ जणांचा मृत्‍यू झाला, त्‍यात अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांच्‍या अपघांचेच प्रमाण अधिक असल्‍याचेही दिसून येते.

अतिवेगामुळे अपघात आणि मृत्‍यू

वर्ष अपघात मृत्‍यू

२०२० १,८४५ १८१

२०२१ २,४६० २०३

२०२२ २,७५१ २४०

२०२३ २,६१६ २७०

२०२४ २,५८२ २७१

एकूण १२,२५४ १,१६५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT