Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: 98 दिवसांत 66 जणांचे बळी, दर तिसऱ्या दिवशी एक मृत्यू; 80 टक्के अपघातांत दुचाकी

Goa Accident Death Case: कारने धडक दिल्याने सुचिता बांदेकर या २३ वर्षीय तरुणीचा जीव हकनाक गेल्याने गोव्यातील रस्त्यावरील अपघाती मृत्यू हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Road Accident Death Rate Analysis : बुधवारी सकाळी सकाळी आपल्या स्कूटरवरून कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना माशे काणकोण येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने धडक दिल्याने सुचिता बांदेकर या २३ वर्षीय तरुणीचा जीव हकनाक गेल्याने गोव्यातील रस्त्यावरील अपघाती मृत्यू हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला. यंदाच्या वर्षात फक्त ९८ दिवसांत झालेल्या रस्ता अपघातातील आजचा हा मृत्यू ६६ वा बळी ठरला आहे. यातील ८० टक्के दुर्घटना दुचाकीशी निगडीत आहेत.

गोव्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या असल्या तरी या योजना अपघाती मृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यास कमी पडत असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. १ जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत गोव्यात एकूण ६४ जीवघेण्या अपघातांची नोंद झाली असून त्यात ६६ जणांचे बळी गेले आहेत. ही आकडेवारी पाहता गोव्यात दर ३५ व्या तासात एकाचा बळी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपघातास कार चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सदर काल चालक चुकीच्या बाजूने आपली कार घेऊन आल्याने हा अपघात झाला. वाहन चालकांचा निष्काळजीपणा, अतिवेगाने वाहने हाकणे, खराब रस्ते आणि रुंद झालेले रस्ते ओलांडताना येणाऱ्या अडचणी यामुळे हे जीवघेणे अपघात होत असून त्यांच्यावर नियंत्रण आणणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.

गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार यंदा १ जानेवारी ते आजपर्यंत रस्ता अपघातात बळी गेले आहेत त्यातील ८० टक्के बळी दुचाकी अपघातांशी निगडीत असून या कालावधीत ४२ दुचाकी चालविणाऱ्यांना तर ६ दुचाकीवर मागे बसलेल्यांना असे एकूण ४८ जणांना मृत्यू आला आहे. इतर मृतांमध्ये ७ अन्य वाहनाचे चालक, पाच पादचारी, तीन प्रवासी, दोन सायकलस्वार तर एकाचा अन्य प्रकारे मृत्यू झाला आहे.

आठ दिवसांत चार बळी

एप्रिलच्या या पहिल्या आठ दिवसांत रस्ते अपघातात चार बळी गेले असून त्यातील तीन दुचाकी चालविणाऱ्यांचे असून एक मागे बसलेल्याचा आहे. या चारपैकी दोन महिला आहेत. यंदा जानेवारीत १८, फेब्रुवारीत २३ तर मार्चमध्ये २१ जणांचे रस्ते अपघात बळी गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

प्रत्येक पंचायतीला 10 हजार रोपं लावण्याचं टार्गेट! सरकारी आदेशानंतर गोव्यातील गावागावांत जागेसाठी धावपळ; वृक्षारोपणानं समोर आणलं वास्तव

Indian Population: "भारताचा जन्मदर सातत्याने घटतोय..." एलॉन मस्कच्या 'त्या' पोस्टने उडवली खळबळ

FIFA World Cup: मेस्सी एकदा जिंकला...आता रोनाल्डोही जिंकावा

SCROLL FOR NEXT