Director General of Police Jaspal Singh
Director General of Police Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accidents: गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारीत अपघातांमध्ये 12% घट; महासंचालकांची माहिती

दैनिक गोमन्तक

Goa Road Accidents: मागील काही महिन्यांपासून गोव्यातील रस्ते अपघातात कमालीची वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातात जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ नोंदवल्यानंतर, 2023 च्या सुरुवातीपासून वाहतूक पोलिसांनी नियमांची कठोर अंमलबजावणी केल्याने यामध्ये काही अंशी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या फेब्रुवारीत अपघातांमध्ये 12% घट झाली आहे.

ते म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, उत्तर गोव्यातील पोलिसांनी 6,592 जणांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चलन देण्यात आले आहे; जी चलन संख्या गेल्या वर्षी 4,863 होती. त्याचप्रमाणे दक्षिण गोव्यातील पोलिसांनी गेल्या वर्षी 4662 चलन देण्यात आले होते; तुलनेत यावर्षी 7771 जणांना चलन देण्यात आले.

दोन्ही जिल्ह्यांमध्ये कडक अंमलबजावणी आणि उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई सुरू असल्यामुळे अपघातांमध्ये 12% घट झाली आहे. 47,000 हून अधिक लोकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आणि गेल्या महिन्यात 2 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याचे महासंचालकांनी सांगितले.

दरम्यान, गोवा पोलिस ट्रॅफिक सेलच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दोन तृतीयांश दुचाकीस्वार होते. गेल्या वर्षी राज्यात 3,011 रस्ते अपघात झाले, त्यापैकी 253 घटना प्राणघातक आहेत.

दुसरीकडे, वाहनांची संख्याही सातत्याने वाढत आहे. 2020 मध्ये गोव्यातील वाहनांची संख्या 14.5 लाख होती, 2021 मध्ये 14.9 लाखांवर पोहोचली तर गेल्या वर्षी ही संख्या 15.4 लाखांवर पोहोचली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2020 पासून वाहनसंख्येमध्ये तीन टक्के वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT