Panaji Municipality: महापालिका आयुक्तांच्या कृतीने पर्यवेक्षकांत संताप

आयुक्तांनी कामगारांविषयी अपशब्द वापरल्याने संताप व्यक्त
Goa Panjim Municipality
Goa Panjim MunicipalityDainik Gomantak

पणजी महापालिकेतील 41 पर्यवेक्षकांना (सुपरवायझर) आयुक्तांनी स्वच्छतेत कसूर केल्याबद्दल शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली. नोटीस बजावल्याने पर्यवेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आयुक्तांनी या कामगारांविषयी अपशब्द वापरल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय सोमवारी याविषयी संघटनेकडे दाद मागणार असल्याचे पर्यवेक्षकांनी सांगितले.

कामगारांकडून शहर स्वच्छ करण्याचे काम योग्य पद्धतीने करून घेतले जात नाही. अनेकजण कामात कुचराई करतात, असे दिसून येत आहे.

माती, कचरा योग्य पद्धतीने उचलला जात नाही. जे काम दिले आहे, ते योग्य पद्धतीने केले जात नाही, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. सायंकाळी सर्व पर्यवेक्षकांना महापालिकेत बोलविण्यात आले आणि त्यांची कानउघाडणी करीत त्यांना कारणे दाखवा नोटीस हातात ठेवली. त्यावर पर्यवेक्षकांना 48 तासांत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

Goa Panjim Municipality
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या किमतीत किरकोळ वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

सर्व पर्यवेक्षकांना नोटीस बजावली तरी त्यांनी पणजीत शिगमोत्सव असल्याने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून तो प्रश्‍न मांडला जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे पर्यवेक्षकांनी सांगितले.

Goa Panjim Municipality
Fire In Goa: नागमोडे-नावेलीत भंगार अड्डा बेचिराख

पर्यवेक्षकांना नोटीस बजावल्याबद्दल आश्‍चर्य वाटले. परंतु पर्यवेक्षकांचे प्रभाग बदलल्याबद्दल प्रथम महापौर व त्यांच्या सल्लागारांना शहरातील गोंधळासाठी जबाबदार धरले पाहिजे.

ज्यामुळे शहरात गोंधळ झाला आहे, त्याबाबत स्मार्ट सिटी यंत्रणेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नाही. उलट स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचाच प्रयत्न होत आहे, असे माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com