Road Accident Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: यापुढे बेजबाबदार वाहनमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा

Vasco: सदोष मनुष्यवध हा गंभीर गुन्हा असून त्‍यात दोषी ठरल्यास 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

Road Accident: वास्कोत काल ममता शेट्ये या महिलेचा अल्पवयीन मुलाच्या दुचाकीची धडक बसून मृत्यू झाला. अल्पवयीन वाहनचालकाकडून झालेल्या अपघातात मृत्यू येण्याची वास्को परिसरातील अलीकडची ही दुसरी घटना.

या अपघातप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास देणारा त्याचा वेळसाव-पाळे येथील मित्र संजय नाईक याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या 304 (सदोष मनुष्यवध) कलमाखाली काल गुन्हा नोंद करण्यात आला.

सदोष मनुष्यवध हा गंभीर गुन्हा असून त्‍यात दोषी ठरल्यास 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. आता अल्पवयीन मुलांकडून जर असे गंभीर अपघात घडले तर साधा अपघाताचा गुन्हा नोंद न करता वाहन मालकाविरोधात आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच नोंद करू, अशी माहिती वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.

यापूर्वी चिखली येथे अल्पवयीन चालवत असलेल्या गाडीचा धक्का बसून एका महिलेचा मृत्‍यू झाला होता. त्या मुलाला भाड्याने गाडी देणाऱ्या वाहनमालकाविरोधातही असाच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला आहे.

वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक बी. सिल्वा यांनी अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघाताबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना, ज्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही त्यांना वाहन चालविण्यास देणे हा गंभीर गुन्हा असल्‍याचे सांगितले.

अशा वाहनमालकाविरोधात अपघाती मृत्यूसंदर्भात गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान (कलम 120- ब) रचल्याचा गुन्हाही नोंद होऊ शकतो याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

दरम्‍यान, वास्को परिसरात एकाच महिन्यात असे गंभीर अपघातांचे दोन प्रकार घडले आहेत. असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी संपूर्ण राज्यात आम्ही जागृती मोहीम हाती घेणार असल्याचे सिल्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT