Goa Drink And Drive Dainik Gomantak
गोवा

Goa Drink And Drive: मद्यपी चालकाने घेतला सासरा-सुनेचा बळी; केपेत भीषण अपघात

Goa Drink And Drive: रविवारी सायंकाळी टीव्ही येथे राजस्थानच्या एका पर्यटकांचा दारू पिऊन दुचाकी चालविल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Drink And Drive: राज्यात अपघातांच्या घटना वारंवार घडत असून बरेचसे अपघात हे वाहतूक नियमनाचे पालन न केल्याने घडत असल्याचे समोर येत आहे. तसेच काही अपघात मद्यप्राशन करून गाडी चालविल्याने घडत असतात.

रविवारी सायंकाळी टीव्ही येथे राजस्थानच्या एका पर्यटकांचा दारू पिऊन दुचाकी चालविल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

या घटनेला काही तास उलटाच बेंदूर्डे-केपे येथे रविवारी रात्री मालवाहू टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.

हे दोघे नात्याने सून आणि सासरे आहेत. टेम्पोचालकाने मद्यपान केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.

अपघातग्रस्त मिनी टेम्पो (MH-08-AP-6349) काजू बियांनी भरलेली पोती मडगावकडे नेत होता. तत्पूर्वी या टेम्पोत उडुपी (कर्नाटक) येथे काही प्रवासी बसले.

टेम्पो गोव्याच्या हद्दीत पोहोचताच चालक राकेश गोरे याने (मूळ रत्नागिरी) याने गाडी थांबवून दारू पिल्याचे उघडकीस आले.

चालक दारूच्या नशेतच वाहन चालवत असता, बंदुर्डे-केपे येथे पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने टेम्पो दहा मीटर खोल दरीत कोसळल्याने टेम्पोत मागे बसलेल्या प्रवाशांवर काजू बियांनी भरलेली जड पोती पडल्याने ते त्याखाली दबून गंभीर जखमी झाले.

यातील हक्कु सतालिया आणि देवराज सतालिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही नात्याने सून आणि सासरा असून ते फुगे विकण्याचे काम करीत होते, अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी राज्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’विरोधात मोहीम उघडली असली, तरी मद्य घेऊन वाहन चालवण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT