Vasco Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Deaths: ..अजून किती लोकांचे जीव जाणार? गोव्यात अपघाती बळींचे दीडशतक; 25 जुलैपासून सात जणांचे मृत्यू

Goa Accident News: पर्रा येथे बुधवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्‍याने ओंकार कारापूरकर (२५) आणि महमद फराज (३०) या दोघांचे बळी गेले असून अन्‍य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: दर तिसऱ्या दिवसाला एक अपघाती बळी, हे चित्र आता नित्याचे झाले असून यंदाच्‍या पहिल्‍या सात महिन्‍यांतच गोव्‍यातील रस्‍त्‍यांवरील बळींनी दीड शतकी आकडा गाठला असून ३१ जुलैपर्यंत बळींची संख्‍या १५६ झाली आहे. एका जुलै महिन्‍याचीच आकडेवारी पाहिल्‍यास ३१ दिवसांत १९ बळींची नाेंद झाली असून गोव्‍यातील एकंदर परिस्‍थिती पाहता ती भयानक पातळीवर पोचली आहे.

पर्रा येथे बुधवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्‍याने ओंकार कारापूरकर (२५) आणि महमद फराज (३०) या दोघांचे बळी गेले असून अन्‍य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. २५ जुलैपासून हा मृत्‍यूंचा सिलसिला अधिकच वाढला असून या सात दिवसांत सात जणांचे बळी गेले. या सात बळींपैकी पाचजण दुचाकी चालविणारे असून एकटा दुचाकीच्‍या मागे बसणारा आहे. तर या एका आठवड्यात एका पादचाऱ्याचाही बळी मुंगूल मडगाव येथील पश्‍चिम बगलमार्गावर गेला आहे.

या जुलै महिन्‍याची १० आणि १८ तारीख ही अधिक धक्‍का देणारी असून १० जुलै रोजी बेतोडा येथे दोन दुचाकींमध्‍ये झालेल्‍या अपघातात एका युवकासह युवतीचा बळी गेला होता तर अन्‍य दोघेजण गंभीर जखमी झाले होते.

१८ जुलै रोजी एकूण तीन अपघात होऊन तिघांचे बळी गेले होते. हे तिन्‍ही अपघात दुचाकीशी संबंधित असून दोन अपघातात अन्‍य वाहनांनी धडक दिल्‍यामुळे दोघा दुचाकी चालकांचा बळी गेला होता तर तिसऱ्या घटनेत काणका-म्‍हापशात दुचाकीच्‍या स्‍वयंअपघातात मागे बसलेली महिला खाली पडून तिचे निधन झाले होते. खडबडीत रस्‍त्‍यामुळे हा अपघात झाला होता. २८ जुलै रोजी उसगावात अशाच एका खराब रस्‍त्‍याचमुळे दुचाकी चालकाचा ताबा गेल्‍याने तो पडून जखमी होऊन नंतर त्‍याचे निधन झाले.

जुलैमध्ये १९ बळी

जुलै महिन्‍यात जे १९ जणांचे बळी गेले आहेत, त्‍यातील १३ जण दुचाकी चालक आहेत. तिघेजण दुचाकीच्‍या मागे बसलेले तर ३ पादचाऱ्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेदरम्यान आली दुःखद बातमी, 'या' स्टार खेळाडूचं निधन, लॉर्ड्सवर झळकावलं होतं शतक

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

Vasco: वास्कोत वाहतूक व्यवस्था कोलमडली! रस्त्याकडेला वाहने पार्क; खात्याने लक्ष देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT