Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: शनिवार गोमंतकीयांसाठी ठरला घातवार; दिवसभरात चार अपघात; एक मृत्युमुखी तर हजारोंचे नुकसान

Goa Accident Case: वाढत्या रस्ते अपघातांमुळे चिंता व्यक्त

Ganeshprasad Gogate

Goa Accident Case: राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहन चालकांचा वाहनांवरील ताबा सुटणे, अपघात प्रवण क्षेत्रे तसेच धोकादायक वळणांवर सुरक्षा कठडे नसणे आणि रस्ते अपघात रोखण्यात प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष हीच करणे समोर येत आहेत.

काल शनिवार हा गोमंतकीयांसाठी अक्षरशः घातवार ठरला. दिवसभरात तब्बल 4 अपघातांची नोंद करण्यात आलीय.

 शनिवार दि. 23 मार्च रोजी संध्या. 6.30 वा. गोकुळवाडी साखळी येथे दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला.

दुचाकीला चारचाकीची मागाहून धडक बसल्याने त्यावरील चालक रस्त्यावर पडला व चारचाकीखाली सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

मृत पावलेल्या व्यक्तीची माहिती प्राप्त झाली असून मडकई फोंडा येथील संदेश मधू नाईक (वय 35)असे त्या युवकाचे नाव आहे.

दुसरा अपघात दक्षिण गोव्यातील फोंडा येथे झाला. या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार पणजी येथून केए - 26-एन - 4480 क्रमांकाची कार मोलेच्या दिशेने जात हाती.

कार चालकाने गुगल मॅपचा आधार घेत चुकीच्या बाजूने गेल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमीला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आल्याचे समजतेय.

तिसरा अपघात धारबांदोडा येथे झाला. पेटके - धारबांदोडा येथे शनिवारी दुपारी मोलेच्या दिशेने जाणाऱ्या कारची एकमेकांना धडक बसून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीच जखमी झाले नसले तरी अपघातात तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले.

तर चौथा अपघात शनिवारी रात्री घडलाय. रात्री उशिरा देवसू कोरगाव येथे प्रज्ञा माध्यमिक शाळेनजीक एका एर्टिगा चालकाचा अपघात झाल्याची घटना घडली.

कार चालकाला रस्त्याचा आणि साईडपट्टीचा अंडज न आल्याने अपघात घडल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. कार साईडपट्टी सोडून खोल घळणीत जाऊन पडल्याने कारचे मोठे नुकसान झालेय.

या अपघातग्रस्त कार चालकाचा शोध लागला नसून याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. तसेच ही घटना ज्याठिकाणी घडली त्याठिकाणी संरक्षण भिंतीची गरज असल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT