Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Accident: डिसेंबर महिन्‍यात गोव्‍यात पर्यटकांची गर्दी अधिक असते. त्‍यामुळे हा महिना हा गोव्‍यासाठी नेहमीच ‘डेडली’ बनलेला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: डिसेंबर महिन्‍यात गोव्‍यात पर्यटकांची गर्दी अधिक असते. त्‍यामुळे हा महिना हा गोव्‍यासाठी नेहमीच ‘डेडली’ बनलेला आहे. यावेळीही त्‍याचा प्रत्‍यय येत असून १ ते १६ डिसेंबर या सोळा दिवसांत राज्यात रस्‍त्‍यावर १६ बळी गेले आहेत. २५ डिसेंबरनंतर गोव्‍यातील पर्यटकांची गर्दी आणखीनच वाढणार असल्याचे अपघाताचे प्रमाण हाताबाहेर जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

गोव्‍यात दरवर्षी रस्‍ता अपघातात २७० ते २९० च्‍या आसपास बळी जातात. यंदा १ जानेवारी ते १६ डिसेंबर या कालावधीत २३७ प्राणघातक अपघात घडले असून त्‍यात २४९ जणांचे बळी गेले आहेत.

पोलिसांच्‍या कागदोपत्री ही संख्‍या मागच्‍या वर्षाच्‍या तुलनेत काही प्रमाणात कमीच आहे. वाहन चालकांचा निष्‍काळजीपणा आणि राज्‍यातील खराब रस्‍ते आणि सदोष रोड इंजिनिअरिंग यामुळेच गोव्‍यात बळी जात असल्‍याची प्रतिक्रिया गोवा कॅनचे निमंत्रक राेलंड मार्टिन्‍स यांनी व्‍यक्‍त केली आहे.

सर्वाधिक बळी दुचाकीचालकांचे

गोव्‍यात आतापर्यंत जे बळी गेले त्‍यात सर्वांधिक बळी हे दुचाकी चालकांचे असून गेल्या साडेअकरा महिन्‍यात तब्‍बल १४७ दुचाकी चालक ठार झाले आहेत तर दुचाकीच्‍या मागे बसणाऱ्यांच्या मृत्‍यूची संख्‍या ही २८ आहे.

गोव्‍यातील बहुतेक रस्‍ते रुंद असून तेही अपघातांना आमंत्रण देणारे आहेत. मागच्‍या साडेअकरा महिन्‍यांत गाेव्‍यात रस्‍ता अपघातात मृत पावलेल्‍या पादचाऱ्यांची संख्‍या ५४ आहे. अन्‍य वाहन चालकांच्‍या प्रवाशांच्‍या आणि सायकलस्‍वारांच्‍या मृत्‍यूंची संख्‍या अनुक्रमे १०, ६, व १ अशी आहे. तर तीन मृत्‍यू इतरांचे आहेत.

गाेव्‍यातील रस्‍ता अपघातातील मृत

दुचाकी चालक १४७

दुचाकीच्‍या मागे बसणारे २८

अन्‍य वाहनांचे चालक १०

पादचारी ५४

प्रवासी ०६

सायकल स्‍वार ०१

अन्‍य ०३

एकूण २४९

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT