Mandovi  Dainik Gomantak
गोवा

Goa River Survey: नद्यांच्या पाण्याचे होणार अभ्यासपूर्ण सर्वेक्षण, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने दिलीय 'ही' माहिती

मांडावी, झुआरी, तेरेखोल आणि शापोरा या नद्यांच्या पाण्याचा अभ्यास करण्यात येणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa River Survey येत्या जुलै महिन्यात गोव्यातील मांडावी, झुआरी, तेरेखोल आणि शापोरा या नद्यांच्या पाण्याचा अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोनपावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्यावतीने हा अभ्यासपूर्ण सर्वेक्षण कार्यक्रम केला जाणार आहे. सागरी अभियंता आणि जहाज सर्वेक्षक ऑक्टाव्हियो रॉड्रिग्ज यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

19 आणि 27 जुलै रोजी मांडावी नदीत पणजी येथील फिशरीज जेट्टी येथे, 21 आणि 29 जुलै रोजी झुआरी नदीत बोरी येथील पुलाखालील बाजूस, 22 आणि 30 जुलै रोजी तेरेखोल केरी येथील आरोंदा पुलानजीक 20 आणि 28 जुलै रोजी शापोरा नदीत कोलवाळ- धारगळ पुलानजीक पाण्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

या दरम्यान प्रवासी लाँच, फेरी बोटी, मासेमारी ट्रॉलरचे टिंडेल, पर्यटक बोटी, क्रूझ बोटी इत्यादींनी या नद्यांमधून प्रवास करताना खबरदारी घेण्याची आणि सुरक्षितरित्या प्रवास करण्याची सूचना करण्यात आली असून गस्त नौकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील बंदरे, जहाज वाहतूक खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT