पणजी: राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वाढत्या आर्द्रतेमुळे उष्म्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवत असून अंगाची लाहीलाही होत आहे.
घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागत असून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत आहे. पंखा किंवा वातानूकलन सेवे शिवाय राहणे अशक्य होत आहे. काल राज्यात कमाल ३४.८ अंश सेल्सिअस तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात ८२ टक्के इतक्या कमाल आर्द्रतेची नोंद करण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ५ टक्के अधिक होती. पुढील चार दिवस राज्यात उष्म्याचा प्रभाव जाणवणार असून हवामान कोरडे राहणार आहे. पुढील ४८ तासांत राज्यात कमाल ३५ अंश सेल्सिअस तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची राहण्याची शक्यता आहे.
आर्द्रतेचे परिणाम आरोग्यावर...
आपल्या वातावरणात थोडेफार बाष्प असतेच त्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. हवामानातील आर्द्रता ६५ टक्केहून अधिक जास्त वाढली तर हवा ओलसर, चिकट भासायला लागते व आपण अस्वस्थ होतो. दमा वगैरे श्वसनाचे विकार असणाऱ्या लोकांना श्वसनात अडचणी येऊ शकतात.
हवामानातील आर्द्रता ३० टक्केहून अधिक कमी झाल्यास हवा कोरडी, रखरखीत वाटायला लागते. श्वास घेताना नाकात कोरडेपणा जाणवतो. हवेत योग्य त्या प्रमाणात आर्द्रता असेल तरच आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच एखादे ठिकाण वातानुकूलित करताना हवेच्या तापमानाबरोबरच हवेतील आर्द्रतेचेही संतुलन राखले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.