Goa Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: शॉर्टसर्किट होऊन मालवाहक रिक्षा आगीच्या भक्षस्थानी

Goa Fire Case: सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: दाबोळी विमानतळाजवळ एका चालत्या मालवाहू रिक्षेला आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली.

माहिती मिळताच वास्को अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी संध्याकाळी 5 वाजता घडली. सदर मालवाहू रिक्षा दाबोळीहून मांगूरहिलच्या दिशेने जात असता विमानतळाजवळ रिक्षाला अचानक आग लागली.

चालकाला याची चाहूल लागताच त्याने प्रसंगवधान राखून आपला जीव वाचवला. रिक्षाला लागलेली आग वाढतच गेली. यावेळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी वरून पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्‍याचे प्रयत्‍न केले.

दरम्‍यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अखेर दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळाली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्‍याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT