Kodar IIT Project Dainik Gomantak
गोवा

Kodar IIT Project: 'कोडारमध्‍ये आयआयटी प्रकल्‍प आणून दाखवाच", 'आरजी'चा इशारा; कार्यकर्त्यांचा गावात मोर्चा

Kodar IIT protest Goa: ‘कोडार गावात आयआयटी आणून दाखवाच’, असे आव्हान देताना गोवा नष्ट करण्यासाठी पुढे सरसावलेल्या भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी ‘आरजी’ जीवाचे रान करेल.

Sameer Amunekar

फोंडा: ‘कोडार गावात आयआयटी आणून दाखवाच’, असे आव्हान देताना गोवा नष्ट करण्यासाठी पुढे सरसावलेल्या भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी ‘आरजी’ जीवाचे रान करेल. शेळ-मेळावलीत जसा प्रचंड विरोध झाला, त्याचीच पुनरावृत्ती कोडारमध्‍येही होईल, असा गंभीर इशारा ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनी दिला. दरम्‍यान, आरजीच्या बॅनरखाली गावात मोर्चा काढून जोरदार घोषणा देण्यात आल्या.

आयआयटीला विरोध करण्‍यासाठी कोडार गावात आज रविवारी मनोज परब यांच्‍यासह आमदार वीरेश बोरकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परब म्हणाले की, या प्रकल्‍पामुळे कोडार गावची नैसर्गिक समृद्धी नष्ट होणार आहे. ग्रामस्‍थांच्‍या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर कोडारवासीयांना अजून भेटत नाहीत, याचा अर्थ काय?

आयआयटी आणून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे गाजर सरकार दाखवत आहे. शिरोडा गावात पाण्याची टंचाई आहे. त्यात असा प्रकल्प आल्यास जलस्रोतांचा विध्वंस तर होईलच शिवाय स्थानिकांच्या रोजीरोटीचे साधनच नष्ट होणार आहे. - मनोज परब, ‘आरजी’चे प्रमुख

आयआयटीद्वारे गोमंतकीय विद्यार्थ्यांना संधी मिळेल, रोजगार मिळेल असे सरकार सांगत आहे. मात्र गोमंतकीय विद्यार्थी बाहेरील राज्यांत जाऊन उच्च शिक्षण घेत आहेत. येथील लोकांच्या रोजीरोटीचे साधन नष्ट करून बिल्डर लॉबीला पायघड्या घालण्याचा हा प्रकार आहे. - वीरेश बोरकर, आमदार (आरजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

SCROLL FOR NEXT