RG Manoj Parab कळंगुट, कांदोळी पंचायत क्षेत्रातील अनेक सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर घरे उभारली असून त्याला स्थानिक आमदारांचा पाठिंबा आहे. ही बेकायदेशीर घरी त्वरित पाडावीत आणि या जमिनीची मालकी मूळ मालकांना द्यावी, अशी मागणी आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली आहे.
मनोज परब यांनी कळंगुट आणि कांदोळी पंचायत क्षेत्रातील संतान डायस, अँटी डायस, इस्मी गोन्साल्वीस, नॉयल डिसोझा यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन विविध सर्व्हे नंबरमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे बेकायदा जमीन बळकावलेल्या पाच प्रकरणांची माहिती दिली.
यात सर्व्हे नंबर 51 - 13, 80 ते 83 व 66 यांचा समावेश आहे.
यापूर्वीच्या आमदारांनीही परप्रांतीयांना सर्व्हे नंबरमधील जमिनी बळकावण्यास मदत केल्याचा आरोप परब यांनी केली आहे. या सर्व प्रकरणांना फाइल्स आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत.
ही बेकायदेशीर उभारलेली सर्व घरे पाडण्यात यावीत आणि ती जमीन मूळ मालकाला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे, असेही मनोज परब म्हणाले.
स्थानिकांच्या पदरी निराशा-
मनोज परब म्हणाले, गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ हे स्थानिक नागरिक आपल्या मालकीच्या जमिनींसाठी पोलिस, न्यायालय आणि सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’कडे फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनी विक्री पत्र तयार करण्यात आली आहेत. मयत व्यक्तींच्या नावे जमीन विक्रीची कागदपत्रे बनवण्यात आली आहेत. यातील बहुतांशी जमिनी कर्नाटकातील नागरिकांनी हडप केल्या असून यासाठी स्थानिक आमदार मायकल लोबो जबाबदार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.