Goa Revolution Day Dainik Gomantak
गोवा

Goa Revolution Day : हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुक्त झालेला गोवा सुरक्षित ठेवावा !

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा मुक्त करण्यासाठी आम्हा स्वातंत्र्य सैनिकांना प्राणांची बाजी लावून जुलमी पोर्तुगीज राजवटीविरोधात लढून गोवा मुक्त करावा लागला. अनेकांनी प्राणांची आहुती दिली.हा गोवा आता सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.गोवा मुक्तीसाठी गोमंतकीयांबरोबर देशातील विविध भागातील क्रांतिकारकांनी योगदान दिले त्यांचेही स्मरण व्हायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शारदाताई सावईकर यांनी केले.

प्रागतिक विचार मंच गोवा या संस्थे तर्फे आज रविवार १८रोजी क्रान्तीदिना निमित्त फोंडा खडपाबांध येथील दिलीप धोपेश्र्वरकर यांच्या निवासस्थानी आयोजित स्वातंत्र्य सैनिक सावईकर यांच्या सत्कार प्रसंगी सावईकर बोलत होत्या.या प्रसंगी प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर,प्रोबस क्लब ऑफ फोंडा हिल टाऊनचे अध्यक्ष अशोक तरळे, लेखिका माधुरीताई उसगावकर, सार्वजनिक श्रीगणेशत्सोव मंडळाचे अध्यक्ष राया बोरकर,कवी विनोद नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी सावईकर यांची विद्यार्थिनी माधुरी उसगावाकर यांनी शारदाताईंच्या कार्याचा आढावा घेतला.अध्यक्ष जयवंत आडपईकर यांच्या हस्ते शाल श्रीफल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन शारदाताईंचा सत्कार करण्यात आला.सुरवातीस जयवंत आडपईकर यांनी स्वागत केले तर रमेश वंसकर यांनी आभार मानले.

आमचे घर क्रांतिकारकांचे होते ठिकाण !

सावईकर पुढे म्हणाल्या, डाॅ.राममनोहर लोहिया यांनी क्रांतीचे रणशिंग फुकंल्यावर आमचे सावईवेरेचे घर हे क्रांतिकारकांचे स्थान झाले होते.क्रांतीची खलबते आमच्या घरी चालायची स्वा. सै.मोहन रानडे, साठे, देशपांडे आदी क्रांतिकारक आमच्याकडे यायचे. दिवस रात्र १५ तरी क्रांती कारक घरी आल्यावर माझी आई रात्री २ वाजेपर्यंत त्यांना जेवण करून करून वाढायची आजच्या युवकांनी पैशांच्या मागे न लागता गोव्याच्या हितावर लक्ष केंद्रीत करावे,असे आवाहन सावईकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT