Bicholim Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!

Bicholim News: राज्यात परतीच्या पावसानं धूमाशान घातलंय. सोमवारी (ता. 7) सायंकाळी परतीच्या पावसानं सत्तरी, डिचोलीला अक्षरश: झोडपून काढलं.

Manish Jadhav

Goa News: राज्यात परतीच्या पावसानं धूमाशान घातलंय. सोमवारी (ता. 7) सायंकाळी परतीच्या पावसानं सत्तरी, डिचोलीला अक्षरश: झोडपून काढलं. हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' वर्तवण्यात आला होता. सत्तरी, डिचोलीत विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे डिचोली, सत्तरीत बत्ती गुल झाली आहे.

सत्तरीत पावसाचा तडाखा!

सत्तरीतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच, वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे. एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मकरमळी, खोतोडा आणि इतर भागात मोठ्याप्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. परतीच्या पावसाने घोलवाडा- खोतोडा येथे सिता राम घोलकर यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे.

Bicholim Rain

डिचोलीत परतीच्या पावसाचं धूमशान!

तसेच, डिचोलीतील अनेक भागात विजांच्या गडगडाटांसह पावसानं धूमशान घातलं. डिचोलीत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळले आहेत, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT