CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Forest Conservation Goa: गर्द वनराईने वेढला गोवा! राज्यात तब्बल 65 टक्के वनक्षेत्र अबाधित, 450 पक्ष्यांच्या प्रजाती; मुख्यमंत्र्यांची माहिती

CM Pramod Sawant: गोवा हे ३७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले छोटे राज्य असूनही राज्यात सुमारे ६० ते ६५ टक्के वनक्षेत्र राखले गेले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा हे ३७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले छोटे राज्य असूनही राज्यात सुमारे ६० ते ६५ टक्के वनक्षेत्र राखले गेले आहे. पर्यावरण आणि विकास यामध्ये योग्य संतुलन राखले पाहिजे आणि आम्ही ते राखत आहोत, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, मात्र ही हिरवाई टिकवण्यासाठी आणि संवर्धनासाठी गोव्यातील नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक व छायाचित्रकार पराग रांगणेकर यांच्या ''वाइल्ड गोवा - अ सिम्फनी इन फेदर्स'' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्मेल कॉलेज फॉर वुमन, नुवें येथील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोज बोरकर आणि माहिती व प्रसिद्धी विभागाचे संचालक दीपक बांदेकर यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गोव्यात (Goa) पक्ष्यांच्या ४९० प्रजाती आढळतात, ज्यामुळे गोवा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पुस्तक पाठवले असता, त्यांनी फोनवर गोव्यात एवढ्या पक्षी प्रजाती आहेत का, असे विचारले. पूर्वी लोक घरी पक्षी पाळत होते, पण जागृतीमुळे आज ते कमी झाले आहे. गोव्यातील प्रजातींच्या पक्ष्यांव्यतिरिक्त इतर देशांतूनही अनेक पक्षी येथे हिवाळ्यात स्थलांतर करून येतात.

सात अभयारण्यांची महत्त्वपूर्ण भूमिका

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, नावेलीसारख्या ठिकाणी विद्यार्थी आणि पर्यटक पक्षी निरीक्षणासाठी आवर्जून भेट देतात. राज्याच्या विकासाबरोबरच शाश्वत विकासावर आम्ही भर देत आहोत. गोव्यातील सात वन्यजीव अभयारण्ये जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT