Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : गोव्यात अपघातांत सरासरी 3 दिवसांत 2 मृत्यू

3 महिन्यांत एकूण 59 जणांचा बळी, दुचाकीस्वारांचे प्रमाण 70 टक्के

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : राज्यात यंदाच्या वर्षी सुरु असलेलं अपघातसत्र अजून संपताना दिसत नाही. प्रत्येक दिवशी किंवा एक दिवसाआड रस्ता अपघातात बळी जात आहे. गेल्या तीन महिन्यात (एप्रिल ते जून 2022) या काळात 802 अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात 59 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या 41 म्हणजेच 70 टक्के इतकी आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक 3 दिवसामागे दोघांचा मृत्यू होत आहे.

अपघातसत्र रोखण्यासाठी पोलिसांनी वळोवेळी अधुनमधून वाहन चालकांविरुद्ध विविध मोहीम आखल्या असल्या तरी रस्ता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही असेच या एकंदर स्थितीवरून दिसून येत आहे. मे 2022 या महिन्यात 30 जणांचा रस्ता अपघातात बळी गेला आहे. दुचाकी अपघातात 41 जण मृत्यू झाले आहे त्यात 36 जण चालक व 5 सहचालकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त रस्त्यावरून जाणाऱ्या 5 पादचाऱ्याचा वाहनाची ठोकर बसून मृत्यू झाला आहे. या तीन महिन्याच्या काळात वाहतूक खात्याने 2,318 जणांविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात 242 अपघात, तर मे महिन्यात 321 आणि जूनमध्ये 239 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. तर 911 जणांवर एप्रिलमध्ये पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती, तर मे महिन्यात 869 आणि जून महिन्यात 538 जणांवर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तीन महिन्यांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये एप्रिल महिन्यात 11 भीषण, 16 गंभीर, 43 किरकोळ अपघात झाले, तर 21 जण गंभीर जखमी आणि 49 किरकोळ जखमी झाले.

मे महिन्यात 28 भीषण अपघात, 15 गंभीर, 65 किरकोळ, तर 18 गंभीर जखमी आणि 77 किरकोळ जखमी झाले. जून महिन्यात 18 भीषण, 15 गंभीर, 43 किरकोळ अपघातांची नोंद झाली, तर 19 जण गंभीर जखमी आणि 76 किरकोळ जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT