Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात 249 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 37 नव्या रूग्णांची नोंद

गोव्यातील कोरोना संसर्गाचा जोर ओसरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील कोरोना संसर्गाचा जोर ओसरत आहे. आज दिवसभरात 37 नव्या रूग्णांची नोंद झाली असून, 41 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 880 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. राज्यातील सक्रिय कोरोनाची संख्या घटली आहे. सध्या गोव्यात 249 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गोव्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.37 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 054 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 53 हजार 839 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील तीन आठवड्यात राज्यात एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजवर राज्यात 3,966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 40,750 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 4,256 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 4,474 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 40,750 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 11 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर देशात 5 लाख 28 हजार 611 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT