Goa Corona Updates
Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दिवसभरात 158 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद, शून्य मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (दि.13 जुलै) दिवसभरात 158 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज देखील एकही कोरोना बाधित दगावला नाही. दिवसभरात 144 बरे झाल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला गोव्यात 947 सक्रिय कोरोना (Active Covid cases in Goa) रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गोवा आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.

गोव्यात आजवर 2 लाख 49 हजार 008 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. गोव्याचा रिकव्हरी रेट 98.07 टक्के एवढा आहे. राज्यात 2 लाख 53 हजार 910 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 3,955 जण कोरोनामुळे दगावले आहेत. गोव्यात आजवर वीस लाख 34 हजार 868 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत तर, मागील 24 तासांत 1,199 नमुने तपासले आहेत.

दरम्यान, देशात मागील चोवीस तासांत 15,815 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 68 जण दगावले आहेत. देशात सध्या 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Covid cases in India) उपचार सुरू आहेत. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी मोठ्या संख्येने एकत्र येणं टाळावे असे अवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT