Dog Bite Cases In Goa Dainik Gomantak
गोवा

सात महिन्यात गोव्यात 8,700 जणांना श्वानाचा चावा; मागील साडे पाच वर्षातील आकडेवारी धक्कादायक

मागील पाच वर्षात 95 हजाराहून अधिकजण श्वानाच्या चाव्याचे शिकार झाले आहेत.

Pramod Yadav

Dog Bite Cases In Goa: गोव्यात मागील सात महिन्यात 8,700 जणांना श्वानाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मागील पाच वर्षात 95 हजाराहून अधिकजण श्वानाच्या चाव्याचे शिकार झाले आहेत. अशी माहिती गोव्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षात श्वानाने चावा घेतल्याच्या सरासरी दिवसाला 40 अशा घटना उघडकीस आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आलीय. मागील साडे पाच वर्षात तब्बल 95,902 जणांना श्वानाने चावा घेतल्याची माहिती विभागाने दिली आहे.

विभागाच्या अहवालानुसार, राज्यात श्वानाने चावा घेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2013 मध्ये 12,857 घटना घडल्या होत्या, त्यानंतर 44 टक्के वाढीसह 2016 मध्ये 18,585 घटना समोर आल्या. तर, 2017 मध्ये 9,094 घटना घडल्या.

2018 मध्ये 22,527, 2029 मध्ये 22,090 अशा घटना समोर आल्या. कोरोना काळात अशा घटनांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. 2020 मध्ये 9,556, 2021 मध्ये 9,126 जणांना चावा घेतल्याचे प्रकार उघडकीस आले.

तर, 2022 मध्ये 23,903 जणांना श्वानाने चावा घेतला. असे अहवालातील आकडेवारीतून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT