Dog Bite Cases In Goa  Dainik Gomantak
गोवा

हैद्राबादसारखी घटना गोव्यातही घडू शकते! 5 वर्षात 87,202 जणांना 'डॉग बाईट', 2022 मध्ये सर्वाधिक घटना

मागील पाच झालेल्या समोर आलेल्या 'डॉग बाईट'ची आकडेवारी सामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी आहे.

Pramod Yadav

नुकतेच हैद्राबाद येथे एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांचे वेळेवर होणारे लसीकरण व निर्बीजीकरण याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

गोव्यात मागील पाच वर्षात गोव्यात एकही रेबीज रूग्णांची नोंद झालेली नाही. गोव्याने याबाबत योग्य नियोजन करून राज्यातून रेबीजला हद्दपार करण्यात यश मिळवले आहे. मात्र, मागील पाच झालेल्या समोर आलेल्या 'डॉग बाईट'ची आकडेवारी सामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी आहे.

गोवा आरोग्य विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, गोव्यात मागील पाच वर्षात तब्बल 87,202 जणांना भटक्या श्वानांनी चावा (Dog Bite) घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसाला जवळपास 48 जणांना भटके कुत्रे चावा घेतात. गोव्यातील भटक्या श्वानांची संख्या देखील अधिक आहे.

गोव्यात जवळपास 70 हजार भटके कुत्रे आहेत, आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2015 मध्ये सुरू झालेल्या योजनेअंतर्गत 70,000 पैकी 27,362 श्वानांचे लसीकरण किंवा निर्बीजीकरण करण्यात आले आहे. असे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाची आकडेवारी सांगते.

Gomantak

कोणत्या साली किती घटना?

2018 ते 2022 या काळात किती जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतला, याची आकडेवारी खालीलप्रमाणे:

(2018 - 22,527), (2019 - 22,090), (2020 - 9,556), (2021 - 9,126), (2022 - 23,903)

भटके कुत्रे अन्नासाठी भटकत असतात, त्यांना वेळेवर खायला मिळाले नाही तर, ते बेचैन होतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि निर्बीजीकरण करणे महत्वाचे आहे. तसेच, केवळ राज्य सरकार हे काम करू शकत नाही. त्यासाठी काही सामाजिक संस्थांचा सहभाग देखील गरजेचा आहे. असे श्वान प्रेमी सांगतात.

सरकारने भटक्या कुत्र्यांना अन्नासह निवारा देणं गरजेचे आहे. तसेच, राज्यात वाढत्या 'डॉग बाईट'च्या घटनांमध्ये सरकारने लक्ष घालणे आवश्यक असल्याचे देखील नागरिकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT